इचलकरंजी (दि. २८ जून २०२५):
हिंदू व्यवसाय बंधू, इचलकरंजी समूहातर्फे आयोजित “पहिले हिंदू व्यवसाय बंधू एकत्रीकरण” हा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला हिंदू व्यावसायिक बांधवांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. विविध क्षेत्रातील उद्योगपती, व्यावसायिक व भगिनींच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वृद्धिंगत झाले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री. सनतकुमार दायमा (धर्मजागरण विभाग संचालक) यांनी मार्गदर्शन करत हिंदू समाजातील व्यावसायिक एकतेचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. श्रीरंग केळकर (संपर्क प्रमुख, हिंदू व्यावसायिक बंधू गृप, महाराष्ट्र) हे होते. त्यांनी एकत्रित व्यवसायाच्या संधी, सहकार्य आणि समाज उभारणीसाठी अशा कार्यक्रमांची गरज यावर मोलाचे विचार मांडले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री. नंदकुमार बापट (संस्थापक, हिंदू व्यावसायिक बंधू गृप, सांगली) यांची होती. त्यांनी उपस्थित बांधवांमध्ये एकात्मतेचा संदेश दिला आणि व्यावसायिक नेटवर्क उभारणीच्या दृष्टीने पुढील दिशा दिली.
बैठक सात्विक रेस्टॉरंट, इचलकरंजी येथे दुपारी ४ ते ६.०० या वेळेत पार पडली. आयोजन अतिशय सुबक पद्धतीने केले गेले होते.
यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले गेले नव्हते, यामुळे उपस्थिती अधिक मोठ्या प्रमाणावर होती.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत श्वेता वरुडे यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश गरगटे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय सुविद्या लेले यांनी केला तर आभार राहुल काबरा यांनी मानले.