कोल्हापूर-सांगली रोडवर एसटी-दुचाकी अपघात, दोन विद्यार्थी गंभीर जखमी

अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या रस्त्यावरील खड्डे(road) चुकवण्यासाठी वाहनधारकांची खूपच मोठी कसरत होऊ लागते. अशातच अनेक अपघातांना देखील सामोरे जावे लागते. अनेक वाहनधारकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.

कोल्हापूर सांगली रोडवर (road)हातकणंगले गावानजीक एसटी व टू व्हीलर चा अपघात होऊन जयसिंगपूर येथील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. न्यू पुरवाल वय वर्ष अठरा व भावेश भरडिया असे जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

हे दोघे जयसिंगपूर कॉलेजचे विद्यार्थी काही कामानिमित्त हातकणंगलेकडे येत होते. यावेळी एसटी व टू व्हीलर चा अपघात होऊन हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणी काही नागरिकांनी पाहताक्षणी या दोघांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयास उपचार सुरू केल्याने त्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची संपूर्णपणे माहिती घेण्यात आली.

कोल्हापूर सांगली रोडवर हातकणंगले जवळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला…

कोटीच्या दागिन्यांची चोरी टीप दिल्यानेच “सॅक” लंपास

वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात… ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं ‘असा’ धरला ठेका