‘माणुसकी फौंडेशन’ च्या प्रयत्नातून बी. कॉम. विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेचा संघर्ष संपला

इचलकरंजी : येथील व्यंकटेश महाविद्यालयात अतिरिक्त तुकडी मंजूर झाल्याने दरवर्षी प्रवेशासाठी बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांना(students) करावा लागणारा संघर्ष आता थांबला आहे. माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवी जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून संघर्षाला पूर्णविराम मिळाला.

येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात दरवर्षी बी.कॉम. साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. परंतु, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची(students) संख्या मोठी अन् तुकडी कमी या विसंगतीमुळे अनेक विद्यार्थी पात्रता असूनही प्रवेशापासून वंचित रहायचे. या संदर्भात माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि जावळे यांनी व्यंकटेश विद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांची भेट घेऊन ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी अतिरिक्त तुकडी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला व पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रवेश मिळण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आता संपला आहे. तुकडी मंजूर झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.

अतिरिक्त तुकडीच्या केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंजूर करून आणलेबद्दल प्राचार्य माने यांचा माणुसकी फौंडेशनच्या वतीने सत्कार करून आभार मानले. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांनी माणुसकी फौंडेशनशी संपर्क करावा, असे आवाहन माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे यांनी केले आहे.

यावेळी प्रा. बाणदार व माणुसकी फौंडेशनचे सदस्य प्रथमेश इंदुलकर, चैतन्य चव्हाण, रंकित रॉय, अज्जू पाटील, आनंद इंगवले, सागर भोसले, प्रवीण मांगलेकर, अनुराग हनगंडी, ऋषी सातपुते, कृष्णा इंगळे, ओंकार सुतार, सौरभ चव्हाण, स्वप्नील कुळवमुडे, ऋषिकेश कुलकर्णी, सिकंदर शेख, ऋषिकेश कुलकर्णी, जुनेद खान, निलेश पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा :

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर.. 

SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान