टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीतील आपली(series) पहिली मालिका जिंकता आली नाही. मात्र भारताने ही मालिका इंग्लंडलाही जिंकून दिली नाही. भारताने इंग्लंड दौऱ्याची सांगता विजयाने केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा पुढील आंतरराष्ट्रीय सामना केव्हा होणार? जाणून घ्या.

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने इंग्लंड दौऱ्याची विजयी सांगता केली. टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी(series) विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या विजयाचं सेलीब्रेशन करणार आहे. टीम इंडिया आता पुढील काही आठवडे रिलॅक्स मोडवर असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस क्रिकेट चाहत्यांना सामन्याशिवाय काढावे लागणार आहेत. त्यामुळे आता भारतीय संघ पुन्हा केव्हा एक्शन मोडमध्ये दिसणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचं मैदानात कमबॅक केव्हा?
भारतीय संघ इंग्लंडनंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. मात्र बीसीसीआयने बांगलादेश दौरा वर्षभरासाठी स्थगित केला. तसेच टीम इंडिया श्रीलंका दौरा करेल, अशी चर्चा होती. मात्र या दौऱ्याबाबत काहीही होऊ शकलं नाही. त्यामुळे आता टीम इंडिया थेट सप्टेंबर महिन्यात एक्शन मोडमध्ये असेल हे निश्चित आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर टी 20I सामने खेळणार (series)आहे. आशिया कप स्पर्धचा थरार 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर टीम इंडिया दुसर्या सामन्यात 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. भारताचा या स्पर्धेतील साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 19 सप्टेंबरला होईल. या सामन्यात ओमानसमोर भारताचं आव्हान असणार आहे. त्यानंतर सुपर 4 फेरीचा थरार रंगणार आहे. सुपर 4 मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या विरोधानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? हे येत्या काही दिवसातंच स्पष्ट होईल.
8 संघ आणि 2 गट
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.
हेही वाचा :
या तीन नव्या SUV लॉन्च होणार, फीचर्स, किंमत जाणून घ्या
रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात
आजची पुत्रदा एकादशी राशींसाठी भाग्यशाली! भगवान विष्णू-गणेशाची एकत्र कृपा, धनलाभाचे संकेत, आजचे राशीभविष्य वाचा