‘उत्कृष्‍ट मत्‍स्‍य पालन’चा सुजाता जाधव यांना पुरस्कार; पुणे विभागात तारळेकरांचा डंका

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त पुण्यात मत्स्य व्यावसायिकांचा सन्मान (farmers)सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात डांगिष्टेवाडीयेथील सुजाता नवनाथ जाधव यांचा मत्‍स्‍य पालन प्रकल्‍पाला प्रथम पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

सुजाता जाधव या आपल्या कुटुंबासह तारळी धरणाच्या जलाशयात बिग फिश फॉर्म नावाचे मत्स्य पालन प्रकल्प चालवतात. गेले सात- आठ वर्षे त्या या प्रकल्प यशस्वीपणे हाताळत असून,(farmers) त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मत्स्य व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट केज कल्चर’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्ड हैदराबाद व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात मत्स्य व्यावसायिकांचा सन्मान सोहळा झाला. सन्मान सोहळ्यामध्ये बिग फिश फॉर्मच्या संचालिका सुजाता जाधव यांचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट केज कल्चर प्रकल्प म्हणून गौरव झाला.

एनएफडीबी संचालक राज्यसभा सदस्य नितीन पाटील यांच्या हस्ते, (farmers)पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मत्स्य व्यवसाय पुणे विभागाचे उपायुक्त विजय शिखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्प संचालिका सुजाता जाधव, नवनाथ जाधव यांनी सन्मान स्वीकारला.

या वेळी मत्स्य व्यवसाय विभाग, पुणेचे उपायुक्त विजय शिखरे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. सन्मान सोहळ्यासाठी मत्स्योत्पादन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील मत्स्य व्यवसाय विभागाचे सहउपायुक्त, अधिकारी, मत्स्य व्यावसायिक आणि नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

 भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य

फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी

लॉर्ड्‌सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना