दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार(Superstar) अजित कुमारचा आणखी एक भयानक रेसिंग अपघात झाला आहे. अलीकडेच स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे एका हाय-स्पीड रेसिंग स्पर्धेत अभिनेत्याचा कारचा अपघात झाला. या महिन्यात अजितचा हा दुसरा अपघात होता, त्यानंतर त्याच्या चाहत्यांची चिंता आणखी वाढली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण आता जाणून घेणार आहोत.

अजित कुमारला(Superstar) त्याच्या अभिनयाबद्दल जितके प्रेम आहे तितकेच त्याला मोटरस्पोर्ट्सबद्दलही खूप आवड आहे. ५३ वर्षीय अभिनेता, जो अभिनयासोबतच रेसिंगमध्येही सक्रिय आहे, तो स्पेनमधील एका रेसिंग स्पर्धेत सहभागी होता. व्हिडिओमध्ये तो अपघातानंतर त्याच्या गाडीतून बाहेर पडताना दिसत होता. तरीही अभिनेता पूर्णपणे सुरक्षित राहिला आणि त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु ही घटना त्याच्या चाहत्यांसाठी खूप चिंतेचा विषय बनली आहे. कारण अभिनेत्यासोबत ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याची कार रेसिंग ट्रॅकवर गंभीरपणे कोसळताना दिसत आहे. तथापि, अपघातानंतर अजित कुमारने लगेचच स्वतःला बाहेर काढले आणि त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला कारण तो कोणत्याही दुखापतीशिवाय बाहेर पडताना दिसला आहे. पण या अपघातामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भीतीची लाट पसरली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला पोर्तुगालमधील एस्टोरिल येथे झालेल्या अपघाताच्या काही दिवस आधी ही घटना घडली. अजित त्यावेळी रेसिंगसाठी सराव करत होता आणि त्याची गाडी अनियंत्रित झाल्यामुळे त्याचा अपघात झाला. सुदैवाने, त्यावेळी तो पूर्णपणे सुरक्षित होता, तरीही अभिनेत्याच्या कारचे मोठे नुकसान झाले होते.

अजित कुमारच्या रेसिंग अपघातांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शर्यतीत असताना त्याचा तिसऱ्यांदा अपघात झाला. यापूर्वी दुबई २४ एच रेसिंग स्पर्धेतही अजितची कार नियंत्रण गमावून सीमारेषेला धडकली. त्यावेळीही अजित कुमार थोडक्यात बचावले आणि त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण प्रत्येक वेळी नवीन अपघात चाहत्यांना अधिकच चिंतेत टाकतो आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करतो.
कामाच्या बाबतीत, अभिनेता अजित कुमार सध्या अधिक रविचंद्रन दिग्दर्शित ‘गुड बॅड अग्ली’ या त्यांच्या चित्रपटावर काम करत आहेत. याशिवाय, त्याने अलिकडेच ‘विदामुयार्च्यी’ या चित्रपटाद्वारे एक हिट चित्रपट दिला आहे. त्याचे चाहते आता त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा :
स्मार्टफोनलाही कान असतात! तुमचा फोन ऐकतोय सर्व सीक्रेट गोष्टी, त्वरित बंद करा ही सेटिंग
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन
महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी