शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे(statement)राजकीय हालचाल सुरू असल्याच्या चर्चेला आज ब्रेक बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, (statement)”जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अलिकडेच, जयंत पाटील यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी केली होती. १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी (statement)राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?
पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू
सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral