महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार (MP) सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रासमोर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराची प्रचंड मोठी आव्हाने आहेत. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ट्रिपल इंजिन भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करणं आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणं हीच प्राथमिकता आहे.”

महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यास मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना सांगितलं की, “सर्व पक्ष एकत्र बसून योग्य व्यक्तीची निवड करतील (MP). मुख्यमंत्री अशी व्यक्ती असावी जी महाराष्ट्राच्या हितासाठी झुकणार नाही आणि स्वाभिमानी राहील.”

याचबरोबर, सुळे यांनी राज्यातील आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेवरुन झालेल्या टीकेला उत्तर देत त्यांनी म्हटलं की, “महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतकी खालावलेली आहे की, पुढील विकासकामेही होण्याची शक्यता नाही.”

फडणवीस यांच्यावर टीका करत सुळे म्हणाल्या, “त्यांच्याकडे विकासकामं सांगण्यासारखी नाहीत, म्हणून फक्त टीका करण्यात व्यस्त आहेत.”

हेही वाचा:

‘मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला…,’ भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान

शिरोळमध्ये राजकारण रंगणार; निवडणुकीच्या रिंगणात कोण बाजी मारणार?

ह्रदयद्रावक… सांगलीत वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू