ताराराणी पक्ष विधानसभेच्या सहा जागा लढवणार! इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळमध्ये….

ताराराणी पक्षाने इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची(Assembly) घोषणा केली असून, यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सहा विधानसभा मतदार संघांत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. शनिवारी आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी या सर्व निर्णयांची माहिती दिली.

इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ विधानसभा(Assembly) मतदार संघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, दक्षिण करवीर आणि राधानगरी यासारख्या इतर मतदार संघांत उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

आमदार प्रकाश आवाडे यांच्या सांगण्यानुसार, जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून कागल मतदार संघात एक मजबूत गट तयार झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी एक तगडा उमेदवार उभा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मानले जात आहे.

हेही वाचा:

तिकीट नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्षांनी थेट राजीनामाच दिला

‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ

तुमची सुरक्षा नको रे बाबा! असं का म्हणतात शरद पवार?