वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीमध्ये 2 जूनपासून टी-20 क्रिकेट (t 20 cricket)वर्ल्ड कपचा ‘रन’संग्राम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिला जत्था न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी हिंदुस्थानी संघ न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्याचा फोटो शेअर केला.
हिंदुस्थानी संघातील काही खेळाडू व सपोर्ट स्टाफ 25 मे रोजी मुंबई विमानतळावरून न्यूयॉर्कला रवाना झाले होते. आता 1 जूनला टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळून न्यूयॉर्कमधील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. हिंदुस्थानी संघासोबत कर्णधार रोहित शर्मासह संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेदेखील इतर खेळाडूंसोबत गेले आहेत. टीम इंडियाचा दुसरा जत्था सोमवारी (दि. 28) वर्ल्ड कपच्या स्वारीवर रवाना झाला(t 20 cricket)
स्टार खेळाडू विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पंडया व यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हे तीन खेळाडू थोडे उशिराने टीम इंडियात दाखल होणार आहेत. या तिघांनीही ‘बीसीसीआय’ची परवानगी घेऊन संघात थोडे उशिराने दाखल होण्याचे नियोजन केले आहे.
आयर्लंडविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कपचा श्रीगणेशा
यजमान अमेरिका व पॅनडा यांच्यातील लढतीने 2 जूनला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा प्रारंभ होणार आहे. मात्र हिंदुस्थानी संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या लढतीने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे.
हिंदुस्थानचा टी-20 वर्ल्ड कप संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडया (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज n राखीव ः शुभमन गिल, खलील अहमद, रिंकू सिंह, आवेश खान.
हेही वाचा :
इचलकरंजीतील तरुण सेल्फी काढताना गेला वाहून….
अण्णा हजारे, गो. रा. खैरनार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार
‘मला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांचे टांगे पलटी करेन.!’; जरांगे पाटलांचा इशारा नेमका कुणाला?