दसरा सण आता काही दिवसांवर आला आहे. यंदाही मुंबईतील (political news todays)छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी दसरा मेळावा रंगताना दिसणार आहे. मागच्या वर्षी या पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटात बराच गदारोळ झाला होता. यंदा मात्र ठाकरे गटाने पहिलं पाऊल टाकलं आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने पहिला अर्ज दाखल केला आहे.
मात्र, मुंबई महापालिकेकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी दसरा मेळावा कोण गाजवणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
छत्रपती शिवाजी महाराज(political news todays) पार्कवर शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदा फक्त ठाकरे गटाकडूनच छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज सादर करण्यात आलाय. ठाकरे गटाने तीन महिन्यांपूर्वीच याबद्दलचा अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्क मिळावा, यासाठी परवानगी अर्ज दिलाय. पण, या अर्जावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय अद्याप दिला नाही. महेश सावंत यांनी या प्रकरणी पालिकेला तीन वेळा स्मरणपत्रही पाठवले आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा 1966 साली झाला होता. मात्र, शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर मैदानाच्या परवानगीवरून दोन्ही गटात जोरदार तू तू मै मै पाहायला मिळाली होती. 2022 मध्ये दोन्ही गटात या मैदानावरून वाद झाला होता. यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. 2023 मध्ये देखील असाच वाद झाला होता. यामुळे गेल्यावर्षी शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. आता यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा मेळावा होणार, याकडे सर्वांच्या नजरा असतील.
हेही वाचा:
एक देश, एक निवडणूक! शक्य आहे की अशक्य?
मोठी बातमी! 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार?
मुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान; मुख्यमंत्री काँग्रेसचाच…!