प्रसिद्ध कंपनीचे CEO आणि HR यांच्या कॉन्सर्टमधील ‘त्या’ व्हिडीओने जगभरात खळबळ!

प्रसिद्ध म्युझिक बँड ‘कोल्डप्ले’च्या कॉन्सर्टमधी(concert) एका ‘किस कॅम’ मोमेंटमुळे अमेरिकेतील टेक विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमर’ नावाच्या एका मोठ्या डेटा सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्याच कंपनीच्या एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबॉट हे या किस कॅममध्ये एकत्र दिसल्याने, त्यांच्यात ऑफिस अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ही घटना बुधवारी, १६ जुलै रोजी मॅसॅच्युसेट्सच्या जिलेट स्टेडियमवर आयोजित कोल्डप्लेच्या कॉन्सर्टदरम्यान(concert) घडली. कार्यक्रमावेळी, स्टेडियमच्या कॅमेऱ्याने गर्दीत उभ्या असलेल्या अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबॉट यांच्यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी, बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनने गंमतीने म्हटले, “अरे, या दोघांना बघा. एकतर यांचे अफेअर सुरू आहे किंवा ते खूप लाजाळू आहेत.” हे ऐकताच, बायरनने खाली वाकून स्वतःला लपवले, तर क्रिस्टिनने आपला चेहरा हाताने झाकला.

त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे हा क्षण काही तासांतच इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या प्रकरणाला ‘कोल्डप्लेगेट’ असे नाव दिले आहे. टिकटॉक आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अँडी बायरन हे जुलै २०२३ मध्ये ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमर’ कंपनीचे सीईओ बनले. ही कंपनी २०२२ मध्ये ‘युनिकॉर्न’ बनली असून, तिचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ५० वर्षीय बायरन विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. तर, क्रिस्टिन कॅबॉट नोव्हेंबर २०२४ मध्ये कंपनीत एचआर प्रमुख म्हणून रुजू झाली होती. कंपनीची संस्कृती आणि कर्मचारी धोरण सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच अशा वादात सापडल्याने या प्रकरणाची अधिकच चर्चा होत आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; ‘महाराष्ट्राच्या विधानसभेत…’

‘त्या’ गोष्टीमुळे पारुपल्लीने आणि मी घटस्फोट…, अखेर सायनाने सगळं सांगून टाकलं!

“पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”