भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी या सीरिजमधील पहिला सामना पार पडणार असून यासाठी टीम(team) इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून आयपीएल 2024 मध्ये एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाज यश दयालची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झालेली आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध यशला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने दाखवलेल्या चांगल्या खेळीचे हे फळ असल्याचं म्हटलं जातं आहे.
19 ते 23 सप्टेंबर पर्यंत टेस्ट सिरीजचा पहिला सामना एम चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असून 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना उत्तर प्रदेश येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येईल. पहिल्या टेस्ट सामन्यासाठी रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान या फलंदाजांना संधी देण्यात आलीये.
तसेच ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना देखील संघात सामील करण्यात आलं आहे. टीम(team)इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर आश्विन याचं टीम (team)इंडियामध्ये पुनरागमन झालं असून रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या स्पिनर्सला सुद्धा संघात स्थान मिळालंय. एवढंच नाही तर मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल या फास्टर गोलंदाजांना स्कॉडमध्ये सामील करण्यात आलंय.
26 वर्षीय वेगवान गोलंदाज यश दयालला मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत संधी देण्यात आली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या यश दयालने 2018 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केले. त्याने आतापर्यंत एकूण 24 फर्स्ट क्लास सामन्यात 76 विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने 28 सामन्यात 28 विकेट्स घेतले आहेत. दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ए आणि बी च्या सामन्यात सुद्धा यश दयालने उत्तर गोलंदाजी करून ए टीमच्या एकूण 4 विकेट्स घेतल्या. यश दयाल याने 2024 च्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना वर्ल्ड क्लास फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम एस धोनीला धावा करण्यापासून रोखले होते.
आयपीएलचा 68 वा सामना हा सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पारपडला होता. या अटीतटीच्या सामन्यात सीएसकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. यावेळी धोनी आणि जडेजा हे दोघे फलंदाजी करत होते त्यावेळी शेवटची ओव्हर टाकण्याची संधी यश दयालला देण्यात आली. एम एस धोनी त्याच्या फॉर्ममध्ये होता. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर धोनीने सिक्स मारला. त्यामुळे आरसीबीवर दडपण आले. परंतु त्यानंतर पुढच्याच बॉलवर यशने धोनीची विकेट घेऊन त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर टाकलेल्या 4 बॉलमध्ये त्याने सीएसकेला केवळ एक धाव दिली. त्यामुळे आरसीबीचा तब्बल 27 धावांनी विजय झाला त्यामुळे आरसीबीने थेट प्लेऑफमध्ये धडक दिली. याच मोठं श्रेय हे यश दयालच्या गोलंदाजीला देण्यात आलं.
आयपीएल 2023 चा सीजन हा यश दयालसाठी फार वाईट ठरला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या गोलंदाजीमुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवण्यात आला. या सामन्यात कोलकाताकडून रिंकू सिंह स्ट्राईकवर होता. यश दयालने टाकलेल्या पहिल्या बॉलवर एक धाव काढून रिंकू स्ट्राईकवर आला. मग त्याने ओव्हरच्या उर्वरित 5 ही बॉलवर सिक्स मारून टीमला विजय मिळवून दिला. यानंतर यश दयाल फारच डिप्रेस झाला होता. यामुळे त्याचे आयपीएल करिअर धोक्यात आले होते. मात्र आयपीएल 2024 मध्ये त्याने आरसीबीकडून जोरदार कमबॅक केले.
हेही वाचा:
भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, पहाटे झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?
भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, पहाटे झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ