दातांवर वाढलेला काळा पिवळा थर क्षणार्धात होईल कमी! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा नियमित करा वापर, दात होईल मोत्यासारखे चमकदार

दातांवर वाढलेल्या पिवळ्या थरामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो.(self confident) त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिवळे झालेले दात स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास दात स्वच्छ होतील.

दातांवर वाढलेला काळा पिवळा थर क्षणार्धात होईल कमी! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा नियमित करा वापर
दातांवर वाढलेला काळा पिवळा थर क्षणार्धात होईल कमी! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा नियमित करा वापर

चेहऱ्याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसण्यासाठी सर्वच महिला सुंदर सुंदर मेकअप करून छान नटून थटून तयार होतात. सुंदर त्वचा, केस आणि आरोग्याची खूप जास्त काळजी घेतली जाते.(self confident) पण दातांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. दातांवर वाढलेला पिवळा थर, पांढरा थर, दातांना लागलेली कीड इत्यादी गोष्टींकडे सतत दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे चारचौघांमध्ये हसताना लाज वाटू लागते. तर काहींचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. मात्र सतत पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते.
तोंडात सतत फोड येतात? शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यास नियमित खा ‘हे’ पदार्थ, कायम राहाल निरोगी

दातांमध्ये सतत होत असलेल्या वेदना, झिणझिणी, दातांना लागलेली कीड किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय सुद्धा करू शकता.(self confident) घरगुती उपाय केल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळा थर, पांढरा थर कमी होण्यास मदत होईल. यामुळे तुमचे दात अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसू लागतील. दातांसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तुरटीचे पाणी अतिशय गुणकारी ठरते. या पाण्यात असलेले गुणधर्म दात स्वच्छ करतात आणि पांढरेशुभ्र होतात.

लवंग:
स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उपलब्ध असतात. मसाल्यांचा वापर केल्यामुळे जेवणाची चव वाढते. लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक गुणधर्म आढळून येतात. यामुळे दातांमध्ये वाढलेली कीड कायमची नष्ट होते आणि दात स्वच्छ दिसू लागतात. दातांची दुर्गंधी, पिवळट थर, आणि झिणझिण्या कमी करण्यासाठी लवंगाचा वापर करावा. पाण्यात लवंग टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. थंड झालेल्या पाण्याच्या गुळण्या केल्यास दातांवर वाढलेली कीड नष्ट होईल.

तुरटी:
मागील अनेक वर्षांपासून तुरटीचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जात आहे. दातांवर वाढलेला काळेपणा, कीड, पिवळा थर कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते आणि दात स्वच्छ दिसू लागतात. यासाठी तयार केलेल्या लवंगाच्या पाण्यात तुरटी मिक्स करा. त्यानंतर या पाण्याच्या गुळण्या करून दात स्वच्छ करा. घरगुती उपाय केल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होऊन दात नैसगरीकरित्या चमकदार आणि सुंदर दिसतील.

संवेदनशीलते नैसर्गिक उपाय:
दातांमध्ये सतत येत असलेल्या झिणझिण्या कमी करण्यासाठी लवंग तुरटीचा वापर करावा. यासाठी लवंगच्या मिश्रणात तुरटी पावडर मिक्स करा. तयार केलेली पावडर दातांवर काहीवेळ ठेवा. यामुळे दातांवर सतत येत असलेल्या झिणझिण्या कमी होतील आणि दात स्वच्छ होतील. याशिवाय नियमित ब्रश केल्यास दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होईल आणि दात स्वच्छ दिसतील.

हेही वाचा :

लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट

ऋषभ पंतने जडेजाच्या निवृत्तीवर उडवली खिल्ली, सोशल मिडीयावर Video Viral

बाप आहे की हैवान ! बाळाला रस्त्याच्या मधोमध फेकले अन्…; हृदय पिळटवून टाकणारा Video Viral