सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांचा ओढा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे(ott platform) वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येत आहे. जून महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेब सीरिज लाँच होणार आहेत. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर 3 सह इतर वेब सीरिज, चित्रपट रिलीज होणार आहे.
गेल्या महिन्यात जूनमध्ये अनेक वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. ओटीटीवर(ott platform) या वेब सीरिजला, चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या आठवड्यात अनेक उत्तम मालिका प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात क्राईम, थ्रिलरचा धडाका असणार आहे.
मिर्झापूर-3
बहुप्रतिक्षीत मिर्झापूर या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जुलैपासून ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन स्ट्रीम होणार आहे.
गरुडन
दाक्षिणात्य चित्रपट गरुडन थिएटर्सनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तमिळ-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो वेत्रीमारन यांच्या मूळ कथेवरून आर.एस. दुराई सेंथिलकुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सूरी , एम. शशिकुमार आणि उन्नी मुकुंदन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
रेड स्वान
रेड स्वान ही कोरियन वेब सीरिज आहे. एका यशस्वी महिला गोल्फपटूच्या जीवनाभोवती या वेब सीरिजची कथा आहे. एक अंगरक्षक नेमल्यानंतर तिच्या कुटुंबाच्या काळ्या बाजूबद्दल माहिती मिळते. नेमकं काय कळतं? तिच्या आयुष्यात काय बदल होतील? हे या सीरिजमधून समजेल.
स्पेस कॅडेट
पार्ट्यांमध्ये रमलेली एका मुलगी नासाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी निवडली जाते. नासासाठी या मोहिमेसाठी ती शेवटची अपेक्षा असते. अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणादरम्यान काय घडते? तिच्या आयुष्यात काय बदल होतात? यावर कथानक आहे.
‘ही वेंट दॅट वे’ He Went That Way
He Went That Way हा 2023 चा अमेरिकन क्राइम ड्रामा चित्रपट आहे. दिग्दर्शक जेफ्री डार्लिंगचा हा पदापर्णातील चित्रपट आहे. एका सीरियल किलर भोवती चित्रपटाची कथा आहे.
हेही वाचा :
रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का?
वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण
शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान