मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा(current political news) विस्तार काल (15 डिसेंबर) नागपुरात थाटामाटात पार पडला. मंत्र्यांच्या शपथविधीसाठी नागपुरातील राजभवनावर मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.
महायुतीच्या(current political news) यंदाच्या सरकारमध्ये 21 नव्या चेहऱ्यांना संधी देेणयात आली आहे. तर अनेक अनुभवी नेत्यांचाही पत्ता कट झाला. निवडणुकीत बहुमाताने निवडून आल्यानंतर अनेक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी इच्छा होती. अनेकांची नावेही मंत्रिपदाच्या चर्चेत होती. पण अनेक नेत्यांचा पत्ता कट झाल्याने शिंदे गटासह भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याही नेत्यामंध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे, शिंदे गटाचे तानाजी सावंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आणि भाजपमध्ये रवी राणा आणि इतर काही नेतेही नाराज असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ नाराज असून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे, तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी तर अधिवेशनात न थांबता थेट आपापले मतदारसंघ गाठले आहेत. तानाजी सावंत शिंदे सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. पण यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार तानाजी सावंत हेदेखील नाराज असल्याची माहिती आहे. तानाजी सावंत नागपूरचं अधिवेशन सोडून पुण्यात परत आले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत इतर आमदारही नाराज असल्याची माहिती आहे.
पण ही नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मात्र, नाराज असणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. नाराज नेत्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच, श्रध्दा आणि सबुरी ठेवा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल . योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर अब्दुल सत्तार यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. पण त्यांच्याही नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
तर मी नाराज नाही, एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल , असे मीपहिल्या दिवसापासून म्हणत होतो. पण शिवसेनेच्या वतीने आठव्यांदा धनुष्यबाणावर निवडणूक लढवणारा मी एकटाच आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल,पण कार्यकर्त्यांच्याही भावना असतात, त्याबाबत आपण त्यांच्याशी बोलू असं अर्जून खोतकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर दिपक केसरकर यांच्याही नाराजीच्या चर्चा आहेत. केसरकर आणि सावंत या दोन्ही नेत्यांकडे शिंदे सरकारमध्ये असताना महत्त्वाची खाती होती.पण फडणवीस सरकारमध्ये या दोन्ही नेत्यांना यावेळी मंत्रिपद नाकारण्यात आले आहे.
हेही वाचा :
तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो ‘हा’ आजार
धक्कादायक ! उधारी मागितल्याने डोक्यात दगड घालून केला तरुणाचा खून
मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा…