सुप्रसिद्ध गायिका रुक्साना बानोनी जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या जाण्याने म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये(music industry) एकच खळबळ उडाली आहे. रुक्सानाच्या निधनानं तिचे चाहते आणि समाजातील लोकांना धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध संबलपुरी गायिका रुक्साना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान, उपचार सुरु असताना रुक्सानाचा मृत्यू झाला.
दिल्लीतील एम्स रुग्णालयात रुक्सानावर उपचार सुरु होते. मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतरही रुक्सानाचे प्राण वाचू शकले नाहीत. तिनं बुधवारी (18 सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. रुक्सानावर विषप्रयोग झाल्याचं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुक्सानाला दुसऱ्या संबलपुरी गायिकेनं स्लो पॉयझन देऊन हळूहळू संपवलं आहे.
15 दिवसांपूर्वी एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान(music industry) रुक्साना आजारी पडल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे. 27 ऑगस्ट रोजी रुक्सानाला भवानीपटना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यानंतर त्यांना बोलंगीर भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालयात आणि नंतर बारगढमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं रुक्सानाला एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे बराच काळ उपचार घेतल्यानंतर तिनं अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा:
बापरे! तिरुपती प्रसादाच्या लाडूत चक्क ‘या’ प्राण्यांची चरबी
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार
टेक्सटाईल पार्क, तीन लाख लोकांना रोजगार; पंतप्रधानांकडून मोठे गिफ्ट