राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावर(trap)आता शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’तून सरकारवर तिखट भाषेत हल्लाबोल करण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मंत्र्यांचे वर्तन, त्यांच्या हनीट्रॅपमधील गुंतागुंतीवरून सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.“रम, रमी, रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झाला आहे,” अशा शब्दांत सामनाने थेट टोला लगावला. पाचवा मंत्री इतरांना अडकवत असताना स्वतःच जाळ्यात अडकल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

सामना अग्रलेखात सांगितलं आहे की, एक मंत्री विधिमंडळात रमी खेळतोय, दुसरा बॅगभर पैसे दाखवत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री प्रेयसीचा खून करूनहीफडणवीसांच्या शेजारी बसतोय, चौथा मंत्री नाशिकच्या हनीट्रॅप जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतोय आणि पाचवा मंत्री इतरांना फसवताना स्वतःच हनीट्रॅपमध्ये अडकतो.हे वर्णन केवळ टीकेपुरतं नसून, गिरीश महाजन यांचा विश्वासू प्रफुल लोढावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे या आरोपांना बळ मिळालं आहे. साकीनाका, अंधेरी, जामनेर आणि नाशिक येथे लोढाविरोधात गुन्हे दाखल असून, त्याच्याविरोधात पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आहे.
सामना म्हणतो की, हे सर्व “हनी गँग” दिल्ली, कोल्हापूर, नागपूर, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये विरोधी आमदार-खासदारांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करून भाजपमध्ये आणत होते. त्यांच्यावर ईडी-सीबीआयची भीती दाखवली गेली, पण खरी भीती होती ती पेनड्राईव्हमधील सीडीजची!“सुरतला जा नाहीतर सीडी बाहेर काढू,” अशा धमक्या देऊन आमदारांना पळवणं हेच २०२२ मधील सरकार पाडण्याचं खरं शस्त्र होतं, (trap)असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, सौ. अमृता फडणवीस यांनी स्वतः सांगितलं की फडणवीस रात्री ‘हुडी’ घालून गुप्त भेटी घेत असत. त्यांच्या खिशात काळ्या रंगाचा पेनड्राईव्ह असे, ज्याचा वापर कोठे आणि कशासाठी होतो यावर स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे, भाजपकडे गुप्त पाळत ठेवणाऱ्या यंत्रणा, इस्रायलमधून आणलेले सॉफ्टवेअर, पेगासस यांसारख्या प्रणाली वापरून विरोधी आमदारांवर नजर ठेवली जात होती, असाही आरोप सामनामधून करण्यात आला.
प्रफुल लोढा हाच हनी ट्रॅपचा सूत्रधार असू शकतो, पण या गँगचे अध्यक्ष कोण?,(trap) असा सवाल सामनाने उपस्थित केला आहे. गिरीश महाजन यांचा लोढावर असलेला विश्वास आणि लोढावरच्या धमकींच्या तक्रारींवरून, भाजपमधील अंतर्गत फाटाफूट उघड होत आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विषय विधानसभेत उडवून लावण्याचा प्रयत्न केला, पण प्रफुल लोढासारख्या भाजप कार्यकर्त्यावरच पोलिसांनी धाड टाकावी लागणं, हेच पुरेसं बोलकं असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा :
आज मंगळवारी ‘या’ 6 राशींवर प्रसन्न होणार गणराया! मनातल्या इच्छा होतील पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा
टीम इंडियावर नवे संकट, तोडावे लागेल इंग्लंडचे ‘चक्रव्यूह’; पिचचा भयानक चेहरा…
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सकारात्मक होणार आज शेअर बाजाराची सुरुवात