ज्या ज्ञानामुळे जीवन सुखकर होणार ते ज्ञान गुरुतत्त्वाने व्यापलेले असते.(education) म्हणजेच ते गुरू म्हणून प्रकट झालेले असते.

गुरुकुल पद्धतीने शिक्षण हे भारताचे वैशिष्ट्य होय. पूर्वीच्या काळी(education) ब्रह्मचर्य व विद्याभ्यासाचा संस्कार झाला की शिष्य गुरूंच्या आश्रमामध्ये राहायला जात असे आणि शास्त्राध्ययन करत असे. गुरू व अध्ययनासाठी आलेले विद्यार्थी हे सर्व एकत्र कुटुंबाप्रमाणे राहत असत, म्हणून ‘गुरू-कुल’ हा शब्द आला असावा.
शास्त्राध्ययनाबरोबरीनेच जीवन कसे जगायचे, समाजात वावरताना कसे वागायचे वगैरे सर्वच गोष्टींचे मार्गदर्शन गुरुकुलात होत असे. राजपुत्र असो, एखाद्या सर्वसामान्यांचे मूल असो किंवा(education) अगदी राम-कृष्णांसारखे देवाचे अवतार असो, आश्रमात जाऊन गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची परंपरा प्रत्येक जण राखत असे.
ज्या ज्ञानामुळे जीवन सुखकर होणार ते ज्ञान गुरुतत्त्वाने व्यापलेले असते. म्हणजेच ते गुरू म्हणून प्रकट झालेले असते. जीवनात लागणारा जोडीदार व बरोबरची मित्रमंडळी, जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे समाधान, शांती व स्वातंत्र्य हे सर्व मिळवून देण्यासाठी लागणारी जी शक्ती वा व्यक्ती तेच गुरुतत्त्व.
शरीरात असणारे गुरुतत्त्व भ्रूमध्याच्या मागे मेंदूत असलेल्या पिनिअल, पिच्युटरी या ग्रंथींमार्फत चालणाऱ्या व्यवहाराशी समानता दाखविते. एकूण शरीरावरची सत्ता या ठिकाणी असलेल्या ग्रंथीमुळे, त्यातून निघणाऱ्या संदेशामुळे, त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्समुळे चालते.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान