लग्नाची वरात निघाली होती, वाटेत गुंड आले आणि नवरीला पळवून (kidnapped)घेऊन गेले.. असे सीन्स अनेक जुन्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. असा प्रकार खऱ्या आयुष्यामध्ये घडला आहे. मध्यप्रदेशमधल्या गुना जिल्ह्यामध्ये गुंडांनी वरातीमध्ये घुसून नवरीला पळवून नेले. या प्रकरणी वरवधुच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सवाई माधोपुरहून नवऱ्यासह वरात मध्यप्रदेशला गेली होती. लग्न झाल्यानंतर वरवधु आणि सर्व कुटुंबीय परत राजस्थानला परतत होते. लग्न ज्या ठिकाणी झाले तेथून १०० किलोमीटरवर वरात पोहोचल्यावर त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला. गुंडांनी नव्या नवरीला(kidnapped पळवून नेले. ही घटना गुना जिल्ह्यातला देहरी गावाजवळ घडली.
नवरीचे अपहरण केल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींसह पोलिसांनी नवरीला देखील ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींना नवरी ओळखत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्यावेळेस नवरीचे अपहरण झाले तेव्हा ती गुंडांना नावाने हाक माकरत होती (kidnappedअशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान अपहरण झालेल्या नवरीबद्दल अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. नवरीचे वय १९ वर्ष आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये दोनदा तिचे अपहरण झाले आहे. २०२३ मध्ये तिचे अपहरण झाले होते. त्यानंतर मार्च महिन्यात गुंडांनी तिला पळवून नेले होते. या माहितीवरुन अपहरणामागे प्रेमसंबंध हा मुद्दा असू शकतो असा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा :
‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत
‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग
खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या