महापराक्रमाचा इतिहास आता जागतिक पटलावर

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, रणरागिनी छत्रपती ताराराणी, कटक पासून अटके पर्यंत विस्तारलेल्या स्वराज्याला, मराठ्यांच्या सेनापतींना, पेशव्यांना आणि मराठ्यांच्या महापराक्रमाला (history) “युनेस्को” या विश्व संस्थेने मानाचा मुजरा केला आहे.

महाराष्ट्रातील आकरा आणि तामिळनाडू मधील एक अशा एकूण 12 गडकोट किल्ल्यांचा समावेश युनेस्कोकडून जागतिक वारसा यादीत केल्याने शौर्याची, महापराक्रमाची, युद्धतंत्राची, असीम त्यागाची, स्थापत्य शास्त्राची, अभिमानाची, स्वाभिमानाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे. आता इतिहासाच्या(history) जागतिक नकाशावर महाराष्ट्र अधिक ठळकपणे आला आहे. युनेस्को कडून अधिकृतपणे घोषणा झाल्यानंतर तमाम शिवप्रेमी मध्ये शिवानंदाची लाट उसळली आहे.

रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी या गडकोट किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. प्रत्येक किल्ला हा छत्रपती घराण्याच्या, मराठा फौजांच्या महापराक्रमाचा मूक साक्षीदार आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यात तर एक छोटे शहर वसले आहे.

शिद्दी जौहारचा वेढा फोडण्यासाठी प्रति शिवाजी बनून यवनांना चकवा देणारा वीर शिवा काशीद, छत्रपती शिवरायांना विशाळगडाकडे सुखरूपपणे जाता यावे म्हणून घोडखिंड (पावनखिंड) लढवणारे बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळ्यांचा महापराक्रम याच पन्हाळा गडाच्या पायथ्याशी झाला(history). जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या प्रत्येक गडकोट किल्ल्याचा स्वतंत्र असा इतिहास आहे.

प्रत्येक किल्ला हा स्थापत्य शास्त्राचा अविष्कार आहे तर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा स्थापत्य शास्त्रातील मुकुट मणी आहे. जगातील 20 पेक्षा अधिक देशांमध्ये तेथील लष्करी अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी तंत्राचा, मराठ्यांच्या जमिनीवरील लढायांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील आकरा, तामिळनाडूमधील एक असे बारा गडकोट किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले जावेत यासाठी केंद्र शासनाने, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने(history), महाराष्ट्र राज्यातील पुरातत्त्व विभागाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष आणि उल्लेखनीय प्रयत्न केले होते. युनेस्कोचा अभ्यास गट त्यासाठी भारतात आला होता. महाराष्ट्रात आला होता.

या पथकाने या सर्व प्रमुख गडकोट किल्ल्यांची सर्वांगीण माहिती घेतली. घडलेला इतिहास तपासून पाहिला. स्थापत्यशास्त्र पाहिले, सुरक्षितता पाहिली आणि मग या गडकोट किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. युनेस्कोने आणि केंद्र शासनाने शुक्रवारी एकाच वेळी त्याबद्दलची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमी तमाम शिवप्रेमींना सांगितली. आणि शिवप्रेमी मध्ये शिवानंदाची लाट उसळली. या निमित्ताने महाराष्ट्र जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे आला आहे. जागतिक वारसा यादीमध्ये नोंद असलेल्या देशांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा, महाराष्ट्रासह भारताचा पश्चिम घाट यांचा समावेश यापूर्वीच करण्यात आलेला आहे. याशिवाय भारतातील अनेक ठिकाणचा जागतिक वारसा(history) स्थळांमध्ये समावेश आहे. सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये आसाम येथील मोईदम अहोम या राजघराण्याच्या ढिगारा अर्थात दफन पद्धतीचा समावेश आहे.

भारतामध्ये अनेक ठिकाणी जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यांचा पर्यटन वाढीसाठी म्हणावा तसा प्रयत्न केंद्र शासनाच्या वतीने केला गेला आहे असे म्हणता येणार नाही. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्नंची अतिशय नितांत गरज आहे.

महाराष्ट्रातील जे अकरा किल्ले जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, त्यांची देखभाल काटेकोरपणे केली गेली पाहिजे. जातीचा धर्माचा विचार न करता या किल्ल्यांमध्ये असलेली बेकायदा बांधकामे तातडीने काढून टाकली पाहिजेत. या किल्ल्यांचे पुरातत्वीय सौंदर्य अबाधित ठेवले गेले नाही तर युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो त्याचे भान राज्यकर्त्यांनी विशेषतः पुरातत्त्व विभागाने ठेवले पाहिजे. अशा किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना युनेस्कोची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. पन्हाळा हा असा एक किल्ला आहे की त्यामध्ये नागरी वस्ती आहे. तेथील लोकांना युनेस्कोच्या अटीचे पालन करावे लागणार आहे.

त्यामुळेच जागतिक वारसा स्थळाच्या यादीतून पन्हाळा किल्ल्याला वगळण्यात यावे अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली होती.. अर्थात ती फेटाळून लावली आणि ते योग्यही होते. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश होणे हा पन्हाळ्याचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा गौरवच केला गेला आहे असे निश्चित म्हणता येईल.

हेही वाचा :

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार, टॅक्स वाढवावा लागेल

सकाळी नाशत्यात झटपट बनवा चविष्ट, पौष्टिक ‘मसाला ओट्स’, दिवसभर राहाल उत्साही