लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर सुरु राहील का? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य

रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या(minister) खात्यात आला आहे. पहिला हप्ता खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे महिलांसाठी सुरु केलेली ही योजना पुढेही सुरु राहील का, यावर महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. ही योजना अविरतपणे आणि यशस्‍वीपणे राबवण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, अशी ग्वाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात (minister)होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात महायुती सरकारची मोठी परीक्षा असणार आहे. या निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता काल काही महिलांना मिळाला आहे. योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्‍या लाभ वाटपाला कालपासून सुरूवात झाली आहे. महिला बालविकास खात्‍याची मंत्री म्‍हणून राज्‍यातील भगिनींना या योजनेचा लाभ देण्‍याची संधी मिळाली आहे. त्‍याबद्दल मी स्‍वतःला भाग्‍यवान समजते’.

‘३० लाखाहून अधिक बहिणींना याचा लाभ आतापर्यंत देण्‍यात आला आहे. अनेक माता भगिनींनी फोन करून, सोशल मीडियावरून आनंद व्‍यक्‍त केला आहे. महायुती सरकारच्‍या माध्‍यमातून सुरू केलेली ही योजना अविरतपणे आणि यशस्‍वीपणे राबवण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, अशी ग्वाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, रायगड जिल्‍ह्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्‍साहात साजरा झाला. रायगडमधील मुख्‍य ध्‍वजारोहण सोहळा अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पार पडला. या सोहळ्याला महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हजेरी लावली. त्यांच्याच हस्‍ते सोहळ्यात ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी शासकीय अधिकारी नागरिक उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी, व्‍यक्‍ती, संस्‍था यांचा यावेळी विशेष गौरव करण्‍यात आला.

हेही वाचा :

इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना

आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने कोल्हापुरात उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाने घेतली राजाराम तलावात उडी