गड किल्ले हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव आहे. (Fort)प्रत्येक किल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच किल्ल्यांवर हिंदू देवतांची मंदिरे पहायला मिळतात. मात्र, एकमेव असा किल्ला आहे ज्या किल्ल्यावर चर्च आहे. हा किल्ला म्हणजे अलिबागमध्येच असलेला कोर्लई नावाचा किल्ला. फारच कमी लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र, ते अपयशी ठरले. पण, मराठ्यांनी जिंकला कोकणातील हा किल्ला जिंकला.
कोलई किल्ल्यावंर जायचे कसे?
अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. अलिबाग शहरापासून ऑटो, कार किंवा दुचाकीने 45 ते 50 मिनिटांत किल्ल्यापर्यंत पोहचता येते. (Fort)या किल्ल्याच्या पायथ्याशी कोर्लई गाव वसलेलं आहे. कोर्लई गावावरून या गडाला कोर्लई किल्ला असं नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. किल्यापर्यंत जाण्याचा रस्ता हा कोर्लई गावातूनच आहे. दीपगृहावरून पायऱ्यांच्या मार्गानेही कोर्लई किल्ल्यापर्यंत पोहचता येते.
किल्ल्यावर चर्च
समुद्र किनाऱ्यावर कोर्लई गाव वसलेले आहे. यामुळे या किल्ल्यावरुन अथांग समुद्राचा नमयरम्य नजारा पहायला मिळतो. कोर्लई किल्ला हा एक जलदुर्ग आहे. यामुळे येथे भक्कम तटबंदी पहायला मिळते. किल्ल्याच्या उत्तर टोकाला बुरुजांची मालिका आणि समुद्राकडे उघडणारं दार आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी तोफा पहायला मिळतात. तसेच किल्ल्यावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख देखील आढळतात. या एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर देखील आहे. चहुबाजूने समुद्र असूनही ही विहिर गोड्या पाण्याची आहे. या किल्ल्यावर अर्धगोलाकार कमानी देखील आहेत. यांचा आकार पाहता या कमानी निजामशाही काळात बांधल्या गेल्या असाव्यात असे संशोधक सांगतात. या किल्ल्यावर एक चर्च देखील आहे. उत्तराभिमुख दिशेला हे चर्च आहेय. या चर्चची डागडुजी पुरातत्व खात्याने केलेली आहे.
कोर्लई किल्ल्याचा इतिहास
कोर्लई किल्ला हा निजामशाही आणि पोर्तुगीज साम्राज्याचा साक्षीदार आहे. पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. यानंतर पोर्तुगिज आणि निजाम यांच्यात किल्ल्यावरुन युद्ध झाले. छत्रपती संभाजी राजेंनी किल्ल्यावर चाल केली. पण किल्ला ताब्यात घेण्यात त्यांना अपयश आले. अखेरीस मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी पोर्तुगीजांशी झुंजून कोरलाईवर ताबा मिळवला.
हेही वाचा :
‘रावेर’चा गड खालसा करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी?
सांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच