हार्दिक- रोहितमधला दुरावा संपला! आता मुंबई इंडियन्स धुरळा उडवणार

हार्दिक पंड्या विरुद्ध रोहित शर्मा या दोघांमधीली वाद सध्या तुफान चर्चेत आहे. जेव्हापासून मुंबई इंडियन्सने(mi indians) हार्दिक पंड्याला संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे, तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यादरम्यान काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, जे पाहून असं वाटलं होतं की दोघांमधील दुरावा अजूनही कायम आहे.

याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाल्याचा पाहायला मिळाला आहे. ५ वेळचा मुंबई इंडियन्स(mi indians) संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेतील सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहेत. मुंबईची सुमार कामगिरी सुरु असताना, मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला दिलासा देणारा व्हिडिओ समोर आला आहे.

सामने आणि सरावातील थकवा घालवण्यासाठी खेळाडूंना गेट अवे ब्रेक दिला जातो. यादरम्यान संघातील खेळाडू एकत्र येतात. एकत्र वेळ घालवतात. थकवा दूर करतात आणि मौज-मस्ती करतात. त्यामुळे खेळाडूंचं बॉन्डींग आणखी चांगलं होतं. MITV वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रोहित आणि हार्दिक पंड्या हात मिळवणी करताना दिसून आले आहेत.

मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक पंड्या इशान किशनला मिठी मारताना दिसून येत आहे. यासह हार्दिक, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह एका जाहीरातीच्या शूटमध्ये एकत्र दिसून आले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू एकत्र मजामस्ती करताना दिसून आले.

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. मात्र कमबॅक कसं करायचं हे या संघाला चांगलच माहित आहे. मुंबई इंडियन्सला या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आता राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यापूर्वी देखील २०१५ मध्ये झालेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे ४ सामने गमावले होते. त्यानंतर कमबॅक करत मुंबई इंडियन्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. असाच काहीसा कारनामा मुंबईचा संघ यावेळी ही करु शकतो.

हेही वाचा :

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? राहुल गांधींनी दिलं उत्तर

‘रावेर’चा गड खालसा करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी?

टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच