मी कुठलाही नियम तोडला नाही. मला कोणताही लेखी आदेश(political news) आला नाही. वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे. कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा, आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी, असं वक्तव्य काँग्रेसचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून सांगली(political news) मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम नाराज झाले होते. त्यांनी ही उमेदवारी काँग्रेसच्या विशाल पाटलांना द्यावी अशी मागणी केली होती.
यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु शेवटी ठाकरेंपुढे त्यांचं काहीही चाललं नाही. त्यामुळे ही उमेदवारी शिवसेनेला मिळाली. उमेदवारी मिळाली नाही म्हणून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. परंतु पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या वरिष्ठांना इशाराच दिला आहे. कारवाई करताना विचार करून करावी असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.
विशाल पाटील म्हणाले, मी कुठलाही नियम तोडला नाही. मला कोणताही लेखी आदेश आला नाही. वसंतदादा घराण्यामध्ये काँग्रेस आहे. कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा, आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी. सांगलीच्या तीन दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला. पाण्यासाठी गावकरी कर्नाटकमध्ये जात आहेत.
भाजपवर लोकांची नाराजी आहे. मला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय पाटील यांच्यावर लोकांचा रोष आहे. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही, असं म्हणत त्यांनी दोन्ही पाटलांवर निशाणा साधला.
तसेच कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी सय्यम ठेवावे. पण त्यांच्या भावना आहेत. त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्यापासून उमेदवारी मागितली होती. परंतु काँग्रेस पक्षावर अन्याय झाला हे दुर्देव आहे. पण पुढच्या काळात विश्वजीत कदम आमचे नेते असतील असं सूचक वक्तव्यदेखील विशाल पाटील यांनी यावेळी केलं.
दरम्यान, विशाल पाटलांच्या भावाला पराभूत केले, विशाल पाटलांचा दुसऱ्यांदा पराभव करू असं वक्तव्य भाजप उमेदवार संजय पाटील यांनी केलं. यावर प्रतिक्रिया देताना विशाल पाटील म्हणाले, काकांनी चांगले स्वप्न बघावे पण निकालावेळी त्याची झोप उडेल, असा टोला पाटील यांनी लगावला.
हेही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा तपोवन वर
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू?
दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका; आज होणार सुनावणी