कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा(statue) कोसळणे ही अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक घटना आहे. त्याबद्दल मालवण पोलिसांनी शिल्पकार आणि रचनाकार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. रचनाकार चेतन पाटील यास कोल्हापुरातून अटक झाली आहे. शिल्पकार जयदीप आपटे याचा शोध सुरू आहे. या घटनेचा वेगवेगळ्या यंत्रणांच्याकडून वेगवेगळ्या पातळीवर तपास सुरू आहे.
अगदी सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींची माफी मागितली आहे आणि ज्यांच्या हस्ते या पुतळ्याचे (statue) अनावरण झाले होते त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण देशाची माफी मागितली आहे. इतके सगळे होऊन झाल्यावर रविवारी महाविकास आघाडी कडून मुंबई सह राज्यभर”जोडे मारो” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राजकीय वास होता हे काही लपून राहिलेले नाही.
कोणत्याही मागणीसाठी, समस्यांवर समाधान शोधण्यासाठी, निषेध करण्यासाठी, तत्सम कारणांसाठी विविध प्रकारची आंदोलने करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो संविधानामुळे प्राप्त झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने रविवारी केलेले आंदोलन रीतसर आणि रास्त होते. जरी त्यास पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नसली तरी.
तथापि घडलेल्या घटनेची राज्य शासनाने तातडीने आणि गांभीर्याने दखल घेतली असूनही, कायदेशीर प्रक्रिया राबवूनही आंदोलन करण्याची गरज होती काय? करायचेच होते तर”आत्मक्लेष आंदोलन”हा पर्याय होता. रविवारी राज्यभर झालेल्या जोडेमारो आंदोलनाने अनेक ठिकाणी वातावरण अशांत बनले होते. भारतीय जनता पक्षांनीही प्रति आंदोलन करून अशांतता निर्माण करण्यास एक प्रकारे मदतच केली असे म्हणता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेची, शिवप्रेमींची(statue) जाहीर माफी मागितल्यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी माफीचा प्रकार शोधून काढला आहे. मोदींची माफी ही राजकीय माफी आहे, आणि ती महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेली नाही, मान्य केलेली नाही असे महाराष्ट्राचे वटमुखत्यार पत्र स्वतःकडे असल्यासारखे, महाराष्ट्राचे प्रवक्ते असल्यासारखे ते सांगतात.
नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी राजकीय असेल तर शरद पवार यांनी काही महिन्यापूर्वी मागितलेली माफी कोणत्या श्रेणीतील आहे? छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात जाहीर सभा घेऊन छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मी चूक केली, मला माफ करा असे त्यांनी म्हटले होते.
कोल्हापुरात येऊन हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातही शरद पवार यांनी माफी मागितली होती. त्यांची ही माफी राजकीय होती असे म्हणता येईल काय? अनेकदा अनेक राजकारण्यांनी काही अनुषंगिक कारणपरत्वे जनतेची माफी मागितली आहे ती माफी कोणत्या वर्गवारीत बसते? संजय राऊत यांच्याही पुढे जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आंबे लोकांच्या समोर बोलताना”चुकीला माफी नाही”असे म्हटले आहे. टाळ्यांची वाक्ये मध्ये मध्ये पेरण्याची त्यांची ती ठाकरे शैली आहे.
महायुती सरकारचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांचे सहकारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांनेही महाराष्ट्राचा ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यांची ही सरकारमध्ये राहूनही आंदोलनात्मक कृती कळण्यापलीकडची आहे. रंग माझा वेगळा दाखवण्याची त्यांना कोणती राजकीय गरज होती? भारतीय जनता पक्षाच्या नारायण राणे यांनाही बेताल आक्रमक होण्यास कुणी सांगितले होते काय? पडलेल्या पुतळ्याची जागा बघायला कोण येतं का? असा संतप्त सवाल त्यांनी मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात केला.
आता तर घटनास्थळी भेट देणाऱ्यांची रीघ लागली आहे. त्यांचेच सहकारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा मालवणला भेट देत आहेत. त्यांना सुद्धा त्यांचा हाच सवाल आहे काय? पुतळा कोसळणे ही देशातील पहिलीच घटना आहे. ती अतिशय दुर्दैवी आहे. शिवप्रेमींच्या हृदयाला पिळ पाडणारी आहे, पण या घटनेकडे सर्वांनीच राजकीय नजरेने बघावे हे सुद्धा दुर्दैवी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा(statue) कोसळण्याला सत्ताधारी जबाबदार आहेत. असा थेट आरोप असा थेट आरोप महा विकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्याकडून कर्नाटकातील बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तेथील सरकारने रातोरात हटवला, मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसचे सरकार असताना तेथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असे घटना घडली होती तेव्हा त्या आंदोलन करणारी मंडळी तेव्हा कुठे होती? असा सवाल उपस्थित केला गेला आहे. त्याचे उत्तर कोण देणार?
हेही वाचा:
वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; गोळीबाराचा VIDEO आला समोर
“शिवाजी महाराजांची तुलना सावरकरांशी? पवारांची मोदींवर सडकून टीका”
आता ‘या’ महिलांना फक्त सप्टेंबरपासूनचेच मिळणार ‘लाडकी बहीण’चे पैसे; जुलै, ऑगस्टचे पैसे नाहीच !