आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराची सुरुवात कशी होणार याबाबत(market) गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होऊ शकते.

१८ जुलै रोजी आज शुक्रवारी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात (market)आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात स्थिर असल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१८९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १५ अंकांनी जास्त होता. या सर्व संकेतांचा विचार करून तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार आहे.
१७ जुलै रोजी गुरुवारी, देशांतर्गत शेअर बाजाराचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २५,२०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ३७५.२४ अंकांनी म्हणजेच ०.४५% ने घसरून ८२,२५ ९ .२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १००.६० अंकांनी म्हणजेच ०.४०% ने घसरून २५,१११.४५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३४०.१५ अंकांनी किंवा ०.५९% ने घसरून ५६,८२८.८० वर बंद झाला. टाटा कंझ्युमर्स, टाटा स्टील आणि (market)हिंडाल्को या शेअर्सनी निफ्टीवर अव्वल कामगिरी केली. टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि इन्फी हे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.१७% ची घसरण झाली, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये ०.१२% ची घसरण झाली.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांना वाटते की भारतीय शेअर बाजारातील भावना सकारात्मक आहे. त्यांनी आज गुंतवणूकदारांसाठी NMDC , पिरामल एंटरप्रायझेस आणि INOX ग्रीन या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. बाजारातील प्रमुख तज्ञांनी आज गुंतवणूकदारांना चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग्ज लिमिटेड आणि धनुका अॅग्रीटेक हे दोन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. निओट्रेडरच्या राजा वेंकटरमन यांनी आज गुंतवणूकदारांना कॉन्कॉर्डबिओ, eClerx Services Ltd आणि श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड हे तीन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
अंकुश बजाज यांनी यांनी आज गुंतवणूकदारांना टाटा स्टील लिमिटेड, प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड हे तीन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये एनएमडीसी, फिलेटेक्स इंडिया आणि बालाजी टेलिफिल्म्स यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
आंनदाची बातमी! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी दोन मुले,मोठ्या जिद्दीने झाली IPS; एन अंबिका यांचा प्रवास
मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?