२९ जुलै रोजी आज शेअर बाजाराची सुरुवात मंदावण्याची शक्यता आहे.(slowly)जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६७२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३८ अंकांनी कमी होता.

२८ जुलै रोजी सोमवारी, देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बेंचमार्क निफ्टी ५० २४,७०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ५७२.०७ अंकांनी म्हणजेच ०.७०% ने घसरून ८०,८ ९ १.०२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५६.१० अंकांनी म्हणजेच ०.६३% ने घसरून २४,६८०.९० वर बंद झाला. .(slowly)२८ जुलै रोजी निफ्टी ५० निर्देशांक ०.६३% घसरला आणि सलग तिसऱ्या सत्रात मंदीचा कॅन्डलस्टिक निर्माण झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४४४.०० अंकांनी किंवा ०.७९% ने घसरून ५६,०८४.९० वर बंद झाला.
MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना पिरामल एंटरप्रायझेस , यूपीएल आणि अंबर एंटरप्रायझेस इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एल अँड टी, एनटीपीसी, वरुण बेव्हरेजेस, एशियन पेंट्स, जीएमआर एअरपोर्ट्स, इंडसइंड बँक, माझागाव डॉक, अदानी टोटल गॅस, गेल, वॉरी एनर्जीज, केईसी इंटरनॅशनल, रेलटेल कॉर्पोरेशन, गो डिजीट, ओएनजीसी, या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे..(slowly)ज्यामध्ये मॅकलिओड रसेल इंडिया, सेंट्रम कॅपिटल, जीएमआर एअरपोर्ट्स, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एसपीआयसी यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा