सूचना तशी चांगली, पण सर्वांनीच वेशीला टांगली!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नद्यांचे, तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी, पर्यावरण(good) राखण्यासाठी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेश मूर्ती ह्या शाडू मातीच्या असल्या पाहिजेत, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात पीओपी च्या बनवण्यात येऊ नयेत, संबंधितांना तशी समज देण्यात यावी, स्थानिक प्रशासनाने प्रतिज्ञापत्रे सादर करावीत अशी आदेश सदृश्य सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तसेच हरित लवादाने केली आहे. गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला असल्याने आणि पीओपी पासून बहुतांशी गणेश मूर्ती बनवण्यात आल्या असल्याने या आदेशाचे, सूचनेचे पालन कसे करता येणार? स्थानिक प्रशासनाची भूमिका काय असणार? असे सवाल पुढे आले आहेत.

सर्व प्रकारच्या गणेशमूर्ती या शाडू (good)पासूनच तयार करण्यात याव्यात, पीओपी पासून त्या बनवल्या जाऊ नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वी पारित केले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीची एक जनहित याचिका ठाणे येथील काही पर्यावरणवादी मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने स्थानिक प्रशासनांना पीओपी च्या संदर्भात आदेश दिले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेश मूर्ती या पीओपी पासून बनवलेल्या प्रतिष्ठापित करू नयेत, तशी त्यांना समज द्यावी आणि स्थानिक प्रशासनाने उच्च न्यायालयात तशी प्रतिज्ञापत्रेही दाखल करावीत अशी आदेश सदृश्य सूचना केली आहे. स्थानिक प्रशासनाने कितीही कठोर भूमिका घेतली तरी यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कडून पीओपी च्या मोठ्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जाणार आहेत.

कारण गणेश मूर्ती बनवण्याची प्रोसेस गणेशोत्सवाच्यापूर्वी किमान सहा महिने सुरू केली जाते. जेव्हा अशा प्रकारची प्रोसेस सुरू होते त्याचवेळी स्थानिक प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असते. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. आणि म्हणूनच गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींची संख्या प्रचंड असते. तुलनेने शाडूच्या मूर्ती कमी संख्येने असतात.

न्यायालयाच्या आणि हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे श्री गणेश मूर्ती पीओपी पासून बनवण्यास राज्य शासनाने विशेषता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोरपणे प्रतिबंध करणे आवश्यक आहे, तथापि या यंत्रणांकडून जाणीवपूर्वक पीओपीच्या श्री मूर्तीकडे दुर्लक्ष केले जाते. शाडूच्या मूर्ती तयार करण्यास मूर्तिकाराचा भरपूर वेळ जातो, शाडूच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती तयार करण्यास वेळ लागत नाही. त्यामुळेच पीओपीच्या मूर्ती तयार करण्याकडे मूर्तिकारांचा तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल असतो.

गणेशोत्सव हा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या श्री गणेश मूर्ती तयार झालेल्या आहेत आणि त्या पीओपी पासून बनवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे न्यायालय आणि हरित लवाद यांच्या आदेशावर तसेच सूचनेवर राज्य शासनाला, प्रदूषण नियंत्रण मंडळाला, तसेच स्थानिका प्रशासनाला काम करणे सहज शक्य नाही.

फार फार झाले तर, स्थानिक प्रशासनाकडून सार्वजनिक(good)गणेशोत्सव मंडळांना पीओपीच्या श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जाऊ नयेत अशा प्रकारच्या नोटीसा बजावल्या जाऊ शकतात. कारण कारण गणेशोत्सव हा हिंदूंचा अतिसंवेदनशील सण आहे. प्रतिष्ठापित केलेल्या पीओपी च्या श्री गणेश मूर्तीला म्हणूनच हटवता येत नाही.

शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात शाडूची माती उपलब्ध होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. पीओपीच्या मूर्ती ना पर्याय आहेत. मोठ्या मूर्ती फायबर पासून बनवता येतात. त्या वर्षानुवर्षे टिकतात. त्या वाहत्या पाण्याचा विसर्जित करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पीओपी ऐवजी या पर्यायाचा विचार केला तर, पर्यावरण हानीचा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी शासनाने, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. गणेशोत्सव तोंडावर आला आहे, आणि त्याचवेळी पीओपी च्या श्री मूर्ती प्रतिष्ठापित करता कामा नयेत, असा आदेश काढला गेला तर त्याची अंमलबजावणी होणे सहज शक्य नाही.

हेही वाचा:

राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एंट्री…

इचलकरंजी शहरातील मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल