सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले;

मालकीण झोपलेली असतानाच गुपचूप घरात घुसला अन् जिवंत कुत्रीला केलं गिळंकृत.(house) अजगराच्या दहशतीचा नवीन व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये तुम्हाला हादरवतील.
सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले;

अजगर हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो.(house) त्याच्या लवचिक शरीराने तो एका झटक्यात शिकाऱ्यावर हल्ला करून त्याला आपल्या शरीरात गिळंकृत करून टाकतो. अहो प्राणीच काय तर वेळ आली तर माणसाला खायला मागे पुढे न मागणाऱ्या अजगराची तऱ्हाच न्यारी… म्हणूनच जंगलातच काय तर शहरी भागातही त्याची दहशत पाहायला मिळते. त्याला पाहताच लोक आपल्या जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. सध्या पावसाचे ऋतू सुरु आहेत, याकाळात बरेच साप, अजगर जंगलातून बाहेर निघून मानवी वस्तीत अन्नासाठी शिरू पाहतात आणि शिकारी दिसला की लगेच त्याच्यावर हल्ला चढवतात. आताही अशीच एक घटना घडली आहे ज्यात एका अजगराने चक्क घरात घुसुन घरातील पाळीव प्राण्याची शिकार केल्याची घटना घडून आली आहे . चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडून आली आहे.(house) येथे एका अजगराने व्हरांड्यात बसलेल्या कुत्र्याला जिवंत गिळंकृत केलं. ही संपूर्ण घटना उना जिल्ह्यातील बंगाना विकास ब्लॉकच्या जोल उप-तहसीलच्या ग्रामपंचायत कथोहच्या धारुन गावाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास मालकीण संध्या देवी तिचा नातू योगेशसोबत घराच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. कुत्री व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात बाथरूमजवळ बसली होती. यादरम्यान अचानक एक अजगर तिथे आला आणि कुत्रीला पाहताच त्याने तिच्यावर हल्ला चढवला.

आवाज ऐकून संध्या देवी झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी पाहिलं तर काय अजगराने त्यांच्या जिवंत कुत्रीला गिळंकृत केले आहे. यानंतर महिलेने ताबडतोब अलार्म वाजवला आणि शेजाऱ्यांना बोलवलं. गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत अजगराने कुत्रीला गिळंकृत केले होते. यांनतर ताबडतोब वन रक्षकांना बोलवण्यात आलं त्यानंतर अजगराला सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आलं. सुदैवाने, या भयानक घटनेत कोणत्याही माणसाला इजा झाली नाही. तथापि, या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा :

मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान

सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता जमा; 5 कोटी 73 लाखांहून अधिक रक्कमेचा आर्थिक दिलासा