करमाळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माहेरी राहणाऱ्या विवाहित (married)महिलेचा खून करण्यात आला असून, या हत्येची सुपारी तिच्या पतीनेच दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पतीसह एकूण सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवाहिता ही काही काळापासून आपल्या माहेरी राहत होती. तिच्या पतीने काही अनोळखी व्यक्तींना सुपारी देऊन तिचा काटा काढला. तपासादरम्यान पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या एकूण सहा जणांना अटक केली असून, त्यात मृत महिलेचा पतीही आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा :
‘मुस्लिम तरुणावर हिंदू तरुणांचा हल्ला? वस्तुस्थिती काय आहे? – व्हिडिओ तपासा
अजित पवारांचा अचानक दिल्ली दौरा: नाराजी नाट्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भेट
सांगलीत पूर: कृष्णा आणि वारणा नद्या पात्राबाहेर, नागरिकांचे स्थलांतर सुरू