पश्चिम बंगालमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. काही पुरुषांनी (woman)एका महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या महिलेचे(woman) हातपाय पकडून तिला मारहाण करण्यात येत आहे. त्यानंतर दोन पुरुष लाकडी दांडक्याने तिला एकापाठोपाठ एक फटके मारत आहेत. यावेळी महिला वाचण्यासाठी जोरात किंचाळताना ऐकू येत आहे. हा व्हीडिओ पश्चिम बंगालमधील कामरहाटी येथील असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हीडिओत महिला मारापासून वाचण्यासाठी किंचाळताना दिसत आहे. मात्र, तिचे हातपाय बांधून ठेवल्यानं तिला काहीही करता येत नाही. कामरहाटी महानगरपालिकेच्या तलाठी क्लबमध्ये हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांचे काही सहकारी आणि गुंडांनी मिळून या महिलेला मारहाण केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसकडून आपल्या पद्धतीने न्याय केला जात आहे. त्यासाठी या महिलेला मारहाण करण्यात आली. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली होती.
पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसंच गरिबांची जमीन बळकावण्याचा प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसंच विरोधी पक्ष भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत ते तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचं भाजपने नमूद केले. ही घटना गंभीर असून, विविध तपास संस्थांद्वारे चौकशी केली जात आहे कोलकात्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावरील हे गाव संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलं आहे.
हेही वाचा :
रोहित नाही तर… श्रीलंका दौऱ्यावर ‘हा’ पठ्ठ्या असणार टीम इंडियाचा कर्णधार?
‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? सरकारची डोकेदुखी वाढली
विधानसभेपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीला ‘पॉवर’! निवडणूक आयोगाचा ‘तो’ निर्णय ठरणार गेमचेंजर