महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मंदिर हे जगातील पाहिलं भूमिज शैलीतील मंदिर मानले जाते.(district) हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून ते विशाल काळ्या दगडावर कोरलेले आहे. श्रावणात इथे भाविकांची खाच्चून गर्दी पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी
अंबरनाथ मंदिर

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे असलेलं अंबरनाथ मंदिर(district) हे जगातील पहिलं भूमिज शैलीतील मंदिर मानलं जातं. या मंदिराची ऐतिहासिक, वास्तुशास्त्रीय व धार्मिक महत्त्वाची ओळख संपूर्ण भारतात आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, लोक याला “अंबरनाथ शिव मंदिर” किंवा “शिवमंदिर” असंही म्हणतात. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ पूर्वेला हे मंदिर आहे, जे वालधुनी नदीच्या काठी वसलं आहे. तुम्ही स्टेशनवरून रिक्षा किंवा कॅब करून मंदिराला भेट देऊ शकता.

वर्षभरातून फक्त एकदाच खुलं होतं हे मंदिर; रक्षाबंधनाच्या दिवशी खच्चून भरते गर्दी

इतिहास आणि निर्मिती

अंबरनाथ मंदिराचे बांधकाम इ.स. 1060 च्या सुमारास(district) शिलाहार राजवंशातील राजा मंञक (मुम्बादेवा) यांनी केलं. हे मंदिर 11व्या शतकातील असून, त्याचा उल्लेख अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो. या मंदिराच्या स्थापनेचा उद्देश धार्मिक पूजा आणि सामाजिक एकतेसाठी केला गेला होता.

भूमिज शैली म्हणजे काय?

‘भूमिज’ ही एक प्राचीन हिंदू मंदिर स्थापत्यशैली आहे, जी मध्य भारतात विशेषतः विदर्भ, मध्यप्रदेश, आणि दक्षिणेकडील भागात आढळते. या शैलीत मंदिराचा शिखर (गुंबज) टप्प्याटप्प्याने उंचावत जातो आणि त्यात अनेक लहान लहान रथाकार भाग किंवा उंचवटे असतात. अंबरनाथचं मंदिर हे याच भूमिज स्थापत्यशैलीचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. त्यामुळे ते जगातील सर्वप्रथम भूमिज शैलीतील मंदिर म्हणून ओळखलं जातं.

मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये

अंबरनाथ मंदिर काळ्या पाषाणात कोरलेलं असून, त्याचा गर्भगृह (मुख्य पूजा कक्ष) जमिनीखाली आहे. भाविकांना या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्यांद्वारे खाली जावं लागतं. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर देवतांचे, अप्सरांचे, आणि विविध पौराणिक कथा दर्शवणारे कोरीव शिल्प आहेत. प्रत्येक शिल्प अत्यंत बारकाईने कोरलेलं असून, त्यावर त्या काळातील कारागिरांची प्रतिभा स्पष्ट दिसते.

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व

दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे हजारो भाविक एकत्र येतात. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नसून, भारतीय स्थापत्यकलेचा एक अनमोल ठेवा आहे. अनेक इतिहासकार आणि पर्यटक अंबरनाथ मंदिराला भेट देऊन त्याची अभ्यासपूर्वक माहिती घेतात. अंबरनाथचं भूमिज मंदिर हे इतिहास, कला, धर्म आणि परंपरेचं संगमस्थान आहे. त्याच्या अद्वितीय भूमिज शैलीमुळे आणि प्राचीनतेमुळे ते जगभरात एक महत्त्वाचं स्थान प्राप्त करतं. हे मंदिर केवळ महाराष्ट्राचं नव्हे, तर संपूर्ण भारतीय वारशाचं अभिमान आहे.

हेही वाचा :

मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान

सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .

महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता जमा; 5 कोटी 73 लाखांहून अधिक रक्कमेचा आर्थिक दिलासा