“…तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”; राऊतांचं वक्तव्य

नागपूर येथील राजभवन येथे काल 15 डिसेंबररोजी महायुती सरकारचा मंत्रीमंडळ(politics) विस्तार पार पडला.यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीने अनेक दिग्गज चेहऱ्यांना धक्का दिलाय. सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांचा मंत्रीमंडळातून पत्ता कट झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

“सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी आमच्याकडील अनेक नेते सोडून गेले. महायुतीच्या मंत्रीमंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आज (16 डिसेंबर) ते माध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(politics) यांच्यावर देखील हल्लाबोल केला. “भ्रष्टाचारबाबत झिरो टॉलरन्स ही नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. फडणवीसांनी हा झिरो टॉलरन्सचा विषय महाराष्ट्रामध्ये राबवला तर त्यांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”,असं संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या सभोवती घेऊन बसलेत. तसंच राज्यात फडणवीस सर्व ताकदीच्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या जवळ घेऊन बसले आहेत. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका, ऑडिट वगैरे काही होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

तसेच, यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देखील टार्गेट केलं. छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या नेत्याची साथ सोडली, ते सगळ्यांसाठी क्लेषदायक होतं. राजकारणामध्ये ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा :

राज्यात थंडीची लाट; पारा दहा अंशांखाली…

महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी

निक्की आणि अरबाजचे सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…