तेव्हा तुमच्या सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागलं; फडणवसींचा विरोधकांवर निशाणा

पुणे: पंधराशे रुपयात महिलांना विकत घेत असल्याचे विरोधक(stomach doctor) म्हणत आहेत. पण नालायकांनो आई, बहिणींचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही. ही योजना माता-भगिणींच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासठी आहे. त्यांचे प्रेम, साथ यामुळे आम्हाला यश मिळत आहे. पण, सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेल्या लोकांना पंधराशे रुपयांचे मोल समजणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. ते पुण्यात लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

“ज्यावेळी आम्ही लाडकी बहिण योजनेची (stomach doctor) घोषणा केली. त्यावेळी तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखायला लागले. ही योजना होऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यानंतर ते कोर्टात गेले. कोर्टाने नाकारल्यानंतर त्यांनी फॉर्मवर पुरुषांचे फोटो लावले. जेणेकरूनमहिलांची फसवणूक करता येईल. जाणीवपूर्वक बनावट फॉर्म भरले गेले. महिलांपर्यंत ही योजना पोहचू नये म्हणून खूप प्रयत्न केले गेले. हेही करून हे लोक थांबले नाहीत. आपले पोर्टल स्लो होण्यासाठी त्यांनी त्यांनी आपल्या पोर्टलवर जकं डेटा टाकला,’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मध्ये चार-पाच दिवस पोर्टल बंद होते. त्याचाही त्यांनी गोंधळ सुरू केला. पण तरीही आम्ही ऑफलाईन अर्ज स्वीकराले आणि नंतर ते ऑनलाईन पद्धतीने भरून महिलांना पैसे दिले. आपलं सरकार हे देना बँक सरकार आहे. आधीचे सरकार हे वसूली सरकार होते. आता वसूली सरकार नाही तर बहिणींना देणारे सरकार आहे. म्हणून आम्ही पुण्यापासून सुरूवात करायची हे ठरवलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” पुण्यापासून आपण औपचारिक सुरूवात जरी केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी पैसे क्रेडिट कऱण्याचे आदेश दिले होते. कारण आपण कार्यक्रम घेऊ, तेव्हा आपल्या बहिणींचे हात रिकामे नसावेत. सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये पोहचले आहेत. ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनीही काळजी करू नका प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे. ”

फडणवीस म्हणाले, “आम्ही31 जुलै पर्यंतच्या फॉर्म आले त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, आता 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांची छाणणी झाल्यानंतर त्यांच्याही खात्यात पैसे येतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही तीन महिन्यांचे पैसे एकदम मिळतील. त्यानंतर आलेल्या फॉर्मचेही पैसे बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. योजना बंद होणार नाही. ही खटाखट योजना नाही, फटाफट योजना आहे.”

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, आपल्याला विकसित भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी भारतातील महिलांचा विकास झाला पाहिजे. महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो. महिलांचा विकास झाला नाही तर भाजपचा विकास झाला नाही तर देशाचा विकास होईल. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आपण मोठ्या प्रमाणात महिला केंद्रीय योजना सुरू केल्या आहेत. लखपती दिदी योजना, लाडकी बहिण योजना यांसारख्या य़ोजना आहेत. या योजनेत मुलगी जन्माला आल्यावर पाच हजार रुपये, पहिल्या वर्गात गेल्यावर पाच हजार रुपये, सातव्या वर्गात गेल्यावर सहा हजार रुपये, अशी प्रत्येक टप्प्यावर मुलींना पैसे देण्याची योजना असेल

हेही वाचा :

मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल; शाळेतील प्रकार

अजब सरकारचा गजब कारभार! योजना लाडक्या बहिणीसाठी अन् लाभ झाला भावाला

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा सिक्रेट निकाह? चर्चांवर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया