‘ विकास आणि नुकसान करणाऱ्या पक्षांमधील (party supplies)फरक समजून घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला आवाहन केले. ‘एक्स’ वर व्यक्त होताना राहुल गांधी म्हणाले,
नवी दिल्ली : ‘‘ विकास आणि नुकसान करणाऱ्या पक्षांमधील (party supplies)फरक समजून घेण्याची वेळ मतदारांवर आली आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला आवाहन केले. ‘एक्स’ वर व्यक्त होताना राहुल गांधी म्हणाले,
‘‘काँग्रेस व भाजपमध्ये फरक आहे. काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी म्हणजे युवकांना कायमस्वरूपी नोकरी, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी, प्रत्येक गरीब महिला लखपती, कामगारांना किमान ४०० रुपये प्रतिदिन वेतन, जातिनिहाय जनगणना व आर्थिक सर्वेक्षण आणि राज्यघटना व लोकांच्या अधिकाराचे संरक्षण तर,
भाजप म्हणजे हमखास बेरोजगारी, शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे, असुरक्षित व अधिकारापासून वंचित महिला, वंचितांसोबत भेदभाव व त्यांचे शोषण, दाखविण्यासाठी लोकशाही पण खऱ्या अर्थाने हुकूमशाही.’’ ‘‘आपले भविष्य आपल्याच हातात असून विचार करा, जाणून घ्या आणि योग्य निर्णय घ्या,’’ असे आवाहनही राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केले आहे.
हेही वाचा :
‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’
ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय
“हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी?” कदमांनी ठाकरेंना डिवचले