मोदी आणि पुतीन यांच्यात फरक नाही; शरद पवार यांचं PM मोदींवर टीकास्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(current political news) हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झालेत. शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे, फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकरांसह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भाजपने जाहीरनाम्यात काय आश्वासन दिले यावर भाष्य करणे आता योग्य नाही. नुसते आश्वासने देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ईडी,सीबीआयचा गैरवापर करणे हे मोदींचे सूत्र आहे. मोदी(current political news) लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. पुतीन आणि मोदी यांच्यामध्ये काही फरक नाही..” असा मोठा घणाघात शरद पवार यांनी यावेळी केला.

“पंतप्रधानांबद्दल बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. त्यांची अनेक भाषणे पंतप्रधानपदाला शोभण्यासारखी नाहीत. पाठीमागच्या जाहीरनाम्यामधील अनेक आश्वासने पुर्ण केली नाहीत. आज नेहरू यांना जाऊन किती वर्ष झाले त्यांचे योगदान काय आहे होतं हे ऐतिहासिक आहे. मात्र पंतप्रधान नेहरूंवरही टीका करतात,” असेही शरद पवार म्हणाले.

“माढामध्ये आमची इच्छा होती की धैर्यशील यांनी ही निवडणूक लढवावी. आज जयंत पाटील या ठिकाणी येतील आणि त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. १६ तारखेला माढा आणि सोलापूर संदर्भात बैठक होईल. एकत्रपणे काम करण्याचा निर्णय झाला आहे. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते हे मोठ्या मताने विजयी होतील अशी खात्री सहकाऱ्यांनी दिल्याचेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा :

सांगलीत नवा ट्वीस्ट! विशाल पाटील काँग्रेसच्या वतीनेच उमेदवारी अर्ज भरणार; ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

मोदी की गॅरंटी! जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

हातकणंगलेसाठी मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबतं, सोमवारी गांधी मैदानात देणार बूस्टर डोस