एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.(jumped)एका विवाहित तरुणाने पत्नीच्या वागणुकीला कंटाळून टोकाचा निर्णय घेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. ही संपूर्ण घटना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या संबंधित फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेली ही घटना संबंधित घडलेल्या ठिकाणाच्या इमारतीच्या लॉबीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की,एक व्यक्ती पळत पळत येतो आणि इमारतीवरुन उडी मारतो. त्याच वेळी त्या व्यक्तीच्या पाठी एक महिलाही पळत पळत येत असते. पण तिने अडवण्यापूर्वीच तो व्यक्ती उडी मारतो. व्हिडिओत तुम्हाला त्या महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आणि परिसरातील नागरिकांची जमलेली गर्दी दिसून येईल.
After a fight with his wife, the husband jumped from the fourth floor and took his life.
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) July 9, 2025
Gharkekalesh can be deadly sometimes! pic.twitter.com/jcracAT79d
संपूर्ण घटना कधी घडली आणि कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. पण सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. (jumped)सध्या या घटनेचा व्हिडिओ सध्या एक्सवरील या अकाउंटवर पाहता येत आहे. त्याच सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओला नेटकऱ्यांनी त्यांच्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे.
ही घटना पाहताच नेटकरी वर्गातून अत्यंत भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.(jumped) एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये म्हटलं की,”काहीही झालं तरी असं पाऊल उचलायला नको पाहिजे होते” तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,”खुपच दु:खत घटना आहे” काही यूजर्संनी म्हटलं,”सखोल चौकशी पोलिसांनी करावी” अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
हेही वाचा :
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान आली दुःखद बातमी
मासिक पाळी तपासण्यासाठी शाळेत विद्यार्थिनींना केलं विवस्त्र; पालकांचा संताप
1000 कोटींच्या यशानंतर रश्मिकाला मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साकारणार बोल्ड भूमिका