कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक(marriage counseling) अध्यक्ष राजू शेट्टी हे एक राजकारणातलं अजब रसायन आहे. वेगवेगळी कारणे सांगून ते उद्धव ठाकरे यांना भेटायला दोनदा मातोश्री वर गेले होते. या दोन्ही भेटी पूर्णपणे राजकीय होत्या हे लपून राहिलेले नाही. आत्ता त्यांनी महाविकास आघाडीच्या समर्थनाशिवाय स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगून टाकले आहे.
खरे तर त्यांना शिवसेनेला(marriage counseling) सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या मांडवात यायचे होते. आता हाच धागा पकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर साखरपुडा झाला होता पण लग्न काही झाले नाही अशी मिश्किल टोलेबाजी केली आहे.
राजू शेट्टी यांना केंद्रात मंत्री व्हायचं होतं तेव्हा ते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या या प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यावर ते महाराष्ट्रातील तेव्हाच्या,”महायुती”(पाच पांडव युती) मधून बाहेर पडले होते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या ते जवळ गेले होते. शरद पवार यांच्या कोट्यातून त्यांना तेव्हा विधान परिषदेवर जायचे होते. पण ते जमले नाही. त्यानंतर महाराष्ट्रात साखरपट्ट्यातील लोकसभेच्या सहा जागा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या जागांच्या बाबत फारशी चर्चा न करता ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अडकून पडले आहेत. स्वतःची उमेदवारी सुरक्षित करून घेण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेऊ लागले.
मशाल चिन्ह घेऊन लढा असे त्यांना सांगण्यात आले. पण तुमचे मला चिन्ह नको, समर्थन आणि मते हवी आहेत अशी राजकीय स्वार्थाची भूमिका त्यांनी घेतली. आता ती चर्चा बंद झाली आहे. ठाकरे गटाने सत्यजित पाटील सरूडकर यांना रिंगणात उतरवले आहे. आता स्वाभिमानी व ठाकरे शिवसेना यांचे बिनसल्यानंतर सतेज पाटील यांनी साखरपुडा झाला पण लग्न झाले नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया देऊन तापलेले वातावरण हलके फुलके करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हातकणंगले मतदारसंघ आमच्या काँग्रेसच्या वाट्याला आला असता तर राजू शेट्टींना आम्ही जमवून घेतले असते किंवा तसा प्रयत्न केला असता असेही ते म्हणाले आहेत. म्हणजे आम्ही साखरपुडाही केला असता आणि लग्नही केले असते असे त्यांना अप्रत्यक्षपणे सूचित करावयाचे आहे.
धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात एकेकाळी मधुर संबंध होते. सत्ता सुंदरीच्या गळ्यात माळ घालण्यासाठी त्यांनी स्वतंत्र राजकारण सुरू केले. दोघात कमालीचा दुरावा निर्माण झाला. तिकडे पाचगाव मध्ये “दक्षिणायन”(दक्षिण विधानसभा मतदारसंघ) सुरू झाले. पुन्हा 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हसन मुस्लिम यांच्या मध्यस्थीने त्या दोघांचा तेव्हा साखरपुडा झाला होता पण पुढे तो निवडणूक निकालानंतर टिकला नाही.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी राजधर्माच्या पलीकडे जाऊन, शिवसेनेच्या संजयकांशी छुपा साखरपुडा करून”आमचं ठरलंय”असे जाहीरपणे सांगितलं होतं. पण संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांचा”हात”सोडून धनंजय महाडिक यांची साखरपुडा केला. आता तर संजय मंडलिक यांच “कमळ गोत्राशी” घरोबा झाला काही महिन्यापूर्वी शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोघांच्या प्रतिमा एकत्र दिसल्या होत्या. काही दिवसांसाठी हे दोघेही तेव्हा लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये दिसले होते. आता सतीश पाटील यांना स्वाभिमानी व शिवसेना यांच्यातील साखरपुडा दिसला आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचं ज्यांच्याशी “ठरलं”होतं, त्यांच्याशी आता बिनसलं आहे. सतेज पाटील यांनी हमीद वाडा सोडून राजवाडा जवळ केला आहे.
हेही वाचा :
‘धक-धक गर्ल’च्या मधूर आवाजाने लावलं वेड VIDEO व्हायरल
देशातील पहिली 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन, सेवेत असणार हॉस्टेस
UPI वरुन करता येणार Cash Deposit, RBI चा पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय