ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, अशा स्मार्टफोन (Smartphone)युजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लवकरच स्मार्टफोन्सचा पूर येणार आहे. टेक कंपन्या त्यांचे नवीन आणि दमदार स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? थोडा धीर धरा. कारण लवकरच अनेक मोठ्या टेक कंपन्या अपग्रेडेड फीचर्ससह त्यांचे नवीन स्मार्टफोन्स(Smartphone) लाँच करणार आहेत. काही स्मार्टफोन्सची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. तर काही कंपन्यांनी अद्याप त्यांची लाँच डेट जाहीर केली जाणार आहे. गूगल, वीवो, रेडमी, ओप्पो आणि इनफिनिक्स या कंपन्यांनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनबाबत घोषणा केली आहे.

गूगल या महिन्यात मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी पिक्सेल 10 सीरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये कंपनीच्या नवीन पिक्सेल डिव्हाईसचा समावेश असणार आहे. पिक्सेल 10 सीरीजअंतर्गत कंपनीचे Google Pixel 10, Google Pixel 10 Pro, Google Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold हे डिव्हाईस लाँच केले जाऊ शकतात.

या डिव्हाईसमध्ये Tensor G5 चिपसेट आणि लेटेस्ट अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. ही सिरीज 20 ऑगस्ट रोजी लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या सिरीजमधील मॉडेलची सुरुवातीची किंमत 80,000 रुपये असू शकते.
Infinix देखील या महिन्यात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या महिन्यात Infinix चा Infinix GT 30 5G+ हा गेमिंग फोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 8 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 7400 प्रोसेसर आणि 4500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जाणार आहे. फोन 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे.
या महिन्यात Vivo त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन (Smartphone)लाँच करणार आहे, ज्यामध्ये Vivo Y400 आणि Vivo V60 यांचा समावेश असणार आहे. हे एक बजेट फ्रेंडली डिव्हाईस असणार आहे. Vivo Y400 मध्ये 6.78 इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक 7300 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची(Smartphone) किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. मिड-रेंज सेगमेंटमधील Vivo V60 12 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेट आणि 6500mAh मोठी बॅटरी असणार आहे. या फोनची किंमत 40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते.
19 ऑगस्ट रोजी Redmi चा नवा स्मार्टफोन 7000mAh बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6S जेन 3 चिपसेट पाहायला मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये AI-फीचर्स देखील असणार आहेत. फोनमध्ये 6.9 इंच डिस्प्ले आणि 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाणार आहे.
Oppo K13 Turbo Series अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. हे स्मार्टफोन्स ओप्पो K13 टर्बो आणि दूसरे K13 टर्बो प्रो या नावाने लाँच केले जाऊ शकतात. या दोन्ही डिव्हाईसची लाँच डेट आणि किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. दोन्ही डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरी दिली जाणार आहे.
हेही वाचा :
शरीरातील ऊर्जा कायम टिकून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मावा लस्सी, नोट करून घ्या चविष्ट पदार्थ
70 वर्षांनंतर हॅरी ब्रूकने केला हा मोठा पराक्रम, असे करणारा तो तिसरा फलंदाज
श्रावणातील आजच्या सोमवारी रात्रीच्या वेळेस करा ‘हे’ उपाय; प्रत्येक काम यश मिळेल नक्की