राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, इंडिया आघाडीत नितीश कुमार यांची वापसी होणार?

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री, जनता दल युनायटेडचे प्रमुख नीतीश कुमार हे लवकरच(country) राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येणार आहे, असा दावा राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने केला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील(country) राष्ट्रीय जनता दल पक्षातील आमदार वीरेंद्र सिंग यांनी मोठा दावा केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे लवकरच भाजपची साथ सोडेल, असा दावा त्यांनी केला आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर ते इंडिया आघाडीसोबत येतील. यानंतर भाजप बिहारमध्ये पराभूत होईल, असाही दावा त्यांनी केला आहे.

या दाव्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा इंडिया आघाडीत परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास बिहारमध्ये भाजप कमकुवत होऊ शकते. बिहारमधील सत्ताही भाजपच्या हातून निसटू शकते. इतकेच नव्हे तर केंद्रातील एनडीए सरकारही अस्थिर होऊ शकते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या. यात भाजपने सर्वाधिक 240 जागांवर विजय मिळवला. तर एनडीएमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या तेलगू देसम पक्षाला 16 आणि संयुक्त जनता दलाला 12 जागी विजय मिळाला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर आहे. या दोन्ही नेत्यांपैकी एकाने जरी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तर मोदी सरकार कोसळू शकते. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंची मर्जी भाजप कशी राखतेय त्यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील इंडिया आघाडीनेही दमदार कामगिरी करत 235 जागा मिळवल्या. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 99 तर दुसऱ्या स्थानी असलेल्या समाजवादी पक्षाने 37 जागा मिळवल्या आहेत.

अशा परिस्थितीत इंडिया आघाडीला सरकार स्थापनेसाठी आणखी 37 जगांची गरज आहे. जर नितीश कुमारांनी वेगळा निर्णय घेतला तर आणखी काही छोटे पक्ष आणि अपक्ष खासदार इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात.

हेही वाचा :

“पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून येणार, ही…”; समरजीतसिंहांचे थेट मुश्रीफांनाच चॅलेंज

गाडी न थांबवल्याचा राग, वाहतूक पोलिसांची तरुणाला भरचौकात मारहाण; Video Viral

अर्जुन – मलायकाचे ब्रेकअप? अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंडची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल!