आजचा गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?(holidays) आजचे राशीभविष्य जाणून घ्या…
जुलैचा शेवटच्या दिवशी ‘या’ 5 राशी ठरणार भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने ऑगस्टची सुरूवात होईल चांगली, आजचे राशीभविष्य वाचा.

वैदिक पंचांगानुसार, आज 31 जुलै 2025, आजचा वार गुरूवार आहे.(holidays) आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य
मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज कामासाठी अचानक प्रवासाचे योग येतील, तरुण(holidays) वर्ग आधुनिक विचाराने भारावून जाईल
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज वडीलधाऱ्यांना तुमचे वागणे विचित्र वाटेल, त्यामुळे घरात वाद होऊ शकतात
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज बेकार तरुणांना काम मिळेल, नवीन नोकऱ्या लागतील, महिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना नोकरचाकरांचे सौख्य मिळेल. तुमच्या कौशल्याला आज वाव मिळेल
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज कितीही कष्ट पडले तरी, हसरा मुखवटा घेऊन हिंडावे लागेल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज उत्साही स्वभावाला थोडी व्यसन घालावी लागेल, समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज जास्तीत जास्त सोशल वागणूक ठेवली, तर त्याचा फायदा होईल, मनाचा मोठेपणा दाखवाल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कामामध्ये विलंब झाला, तरी सबुरीचे धोरण स्वीकारण्यातच तुमचा मोठेपणा आहे
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज घरामध्ये संतती संबंधी काही चिंता निर्माण होऊ शकतात, महिलांनी इतरांना कमी लेखू नये
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो पूर्वतयारी शिवाय कोणतीही गोष्ट न करण्याच्या तुमच्या गुणांचा आज उपयोग होईल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज थोडी अस्थिरता स्वभावात येणार आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यामध्ये कमी पडाल
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या डोक्यात आली नसेल, अशी एखादी फायद्याची गोष्ट तुमच्याकडे येईल.
हेही वाचा :
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .