ऑगस्टच्या पहिल्या दिवशी ‘या’ 6 राशींना लाभ! शुक्रवार आणि देवी लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद, आजचे राशीभविष्य वाचा

आज ऑगस्टचा पहिला दिवस आणि शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी(holidays) दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…

ऑगस्टच्या पहिल्या दिवशी ‘या’ 6 राशींना लाभ! शुक्रवार आणि देवी लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद,(holidays) आजचे राशीभविष्य वाचा
वैदिक पंचांगानुसार, आज 1 ऑगस्ट 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज कामासाठी अचानक प्रवासाचे योग येतील,(holidays) तरुण वर्ग आधुनिक विचाराने भारावून जाईल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज वडीलधाऱ्यांना तुमचे वागणे विचित्र वाटेल, त्यामुळे घरात वाद होऊ शकतात

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज बेकार तरुणांना काम मिळेल, नवीन नोकऱ्या लागतील, महिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो एखाद्या गोष्टींमध्ये वाहून न जाता त्याचे विश्लेषण करणे आज तुम्हाला चांगले जमेल.

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमचा सल्ला घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील, तुमच्या तडफदार आणि आत्मविश्वास पूर्ण वागण्यामुळे अनेक कामांचा फरशा पडाल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, तुमच्याकडचा उत्साह इतरांनी उसना घ्यावा अशी परिस्थिती निर्माण होईल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज राजकारणातील लोकांना आपला प्रभाव जनतेवर पाडण्यासाठी उत्तम काळ आहे, सत्ता आणि मान याचे आकर्षण राहील

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये अधिकाराच्या जागेवर वर्णी लागेल, जबाबदारीची कामे अंगावर पडतील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज सतत काहीतरी कामे करावी लागल्यामुळे थकल्यासारखे वाटले, तरी तोंडावर कसे दाखवणार नाही

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो खेळाडू लोकांना वेगवेगळ्या संधी मिळतील, विद्यार्थी स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतील
.

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज वैचारिकदृष्ट्या बरेच स्थिर आणि दूरदृष्टी ठेवणारे म्हणून तुमची ख्याती होईल, आर्थिक लाभ चांगले मिळतील

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज मनावरचा ताण हलका होऊन जाईल, वारसा हक्काने मिळणारे इस्टेटची कामे मार्गी लागतील.

हेही वाचा :

अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका… 
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?