Lava Storm स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने त्यांचे दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच(launched) केले आहेत, ज्यामध्ये Lava Storm Play 5G आणि Storm Lite 5G यांचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे तुम्ही नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे स्मार्टफोन्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहेत.
Lava Storm Play 5G आणि Storm Lite 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता
Lava Storm स्मार्टफोन सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया. Lava Storm Play 5G स्मार्टफोन भारतात 6GB + 128GB या स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच(launched) करण्यात आला आहे.
या स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Lava Storm Lite 5G स्मार्टफोनचा 4GB + 64GB हा स्टोरेज ऑप्शन भारतात 7,999 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री भारतात Amazon द्वारे केली जाणार आहे. Play व्हेरिअंटची विक्री 19 जून रोजी दुपारी 12 वाजता तर Lite मॉडेलची विक्री 24 जून रोजी सुरु होणार आहे.
डिस्प्ले आणि प्रोसेसर
Lava Storm Play 5G मध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7060 प्रोसेसरने सुसज्ज आहे, यामध्ये 6GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे, हा फोन आउट-ऑफ-द-बॉक्स Android 15 वर आधारित आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, Lava Storm Play 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX752 प्रायमरी रियर सेंसर आणि 2-मेगापिक्सेल सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे(launched). फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 8-मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये सिंगल स्पीकर यूनिट आहे.
बॅटरी
Lava Storm Play 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी USB Type-C पोर्टद्वारे 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये IP64 रेटिंग आहे, जे डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस ऑफर करते. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.
Lava Storm Lite 5G मध्ये MediaTek Dimensity 6400 चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच यामध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. यामध्ये 5-मेगापिक्सेल सेल्फी शूटर आणि 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले, बॅटरी, बिल्ड, ऑपरेटिंग सिस्टम आणि मेन कॅमरा सारखे दूसरे फीचर्स Storm Play 5G प्रमाणेच आहेत.
हेही वाचा :
- महाराष्ट्राच्या राजकारणातील पोरं खेळ कि,चोर खेळ..,?
- विमान काळ बनून कोसळलं! चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
- सांगली : नवऱ्याकडून शारीरिक संबंधाची मागणी, दुसऱ्या बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; लग्नाच्या १५ दिवसानंतरच..