‘या’ आहेत 2025 मधील सर्वात सुरक्षित कार, 5 स्टार सेफ्टी रेटिंग सोबतच किंमतही अगदी स्वस्त

भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.(customer service) अशातच आता सरकारने Bharat NCAP ची सुरुवात केली, जेणेकरून कारची सेफ्टी तपासता येईल आणि सेफ्टी रेटिंगही देता येईल. अलीकडेच भारत एनसीएपीने 2025 च्या सर्वात सुरक्षित कारची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये 5 कार्सना 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्यात मारुती डिझायर सारख्या लोकप्रिय कारचाही समावेश आहे. या लिस्टमध्ये कोणत्या कारचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross)

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही भारतातील लोकप्रिय एमपीव्ही आहे,(customer service) ज्याला भारत एनसीएपीने 5-स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. यात 6 एअरबॅग्ज, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (व्हीएससी), ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारख्या अनेक प्रगत सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.

टाटा हॅरियर ईव्ही (Tata Harrier EV)

टाटा हॅरियर ईव्ही ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मोजली जाते.(customer service) या कारला ॲडल्टच्या सुरक्षेसाठी 32 पैकी 32 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. याच्या सेफ्टी फीचर्समध्ये 7 एअरबॅग्ज, लेव्हल 2 एडीएएस, 540° क्लियर व्ह्यू, 360° 3D कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, एसओएस कॉल फंक्शन आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे.

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)

भारत एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी मारुती सुझुकी डिझायर ही भारतातील पहिली सेडान कार बनली आहे. ही कार गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वाधिक विक्री होणारी सेडान देखील आहे. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये स्टॅंडर्ड म्हणून 6 एअरबॅग्ज आहेत आणि त्यात ESP+, हिल होल्ड असिस्ट, 360° कॅमेरा, एबीएस+ईबीडी आणि टीपीएमएस सारखी फीचर्स आहेत.

किया सायरोस (Kia Syros)

किया सायरोस ही एक नवीन एसयूव्ही आहे, जिला भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारला ॲडल्ट सेफ्टीत 30.21/32 गुण आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 44.42/49 गुण मिळाले आहेत. यात लेव्हल 2 एडीएएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि 20 हून अधिक स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स आहेत.

स्कोडा क्यलॅक (Skoda Kylaq)

भारत एनसीएपीने स्कोडा क्यलॅकला 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील दिले आहे. ॲडल्ट सेफ्टीत या कारला 30.88 मार्क्स आणि चाइल्ड सेफ्टीत 45 गुण मिळाले आहेत. यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रोल-ओव्हर प्रोटेक्शन, हिल होल्ड कंट्रोल आणि मल्टी-कोलिजन ब्रेकिंग यासारख्या एकूण 25 ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.

हेही वाचा :