रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्त प्रवाह खंडित होतो, जो हृदयविकाराचा(heart attacks) झटका, पक्षाघात किंवा स्ट्रोक यांसारख्या घातक आजारांना आमंत्रण देतो.
रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज म्हणजे काय?
रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज ही स्थिती रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर घटक जमा झाल्यामुळे निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह नीट होत नाही. याचे मुख्य कारण चुकीचे खाणे-पिणे, साखरेचे जास्त प्रमाण आणि चुकीची जीवनशैली आहे. आज आपण अशा 5 पेयांबद्दल जाणून घेणार आहोत, जे या समस्येला अधिक गंभीर बनवतात.
- साखरयुक्त सोडा
साखरयुक्त शीतपेयांमध्ये हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप मोठ्या प्रमाणात असतो, जो शरीरात चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजचा धोका वाढतो. अशा प्रकारच्या पेयांचे दीर्घकाळ सेवन केल्याने हृदयविकार(heart attacks), मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका प्रचंड वाढतो. विशेषतः कोल्ड ड्रिंक किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स यांचा नियमित वापर टाळणे महत्त्वाचे आहे. - हाय कॅफीन एनर्जी ड्रिंक
हाय कॅफीनयुक्त आणि साखरयुक्त एनर्जी ड्रिंक्स रक्तदाब वाढवतात आणि हृदय गतीमध्ये अनियमितता निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते आणि पुढे जाऊन त्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो. याशिवाय, या ड्रिंक्समुळे तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या लवकर उद्भवतात. विशेषतः व्यायामानंतर किंवा जास्त प्रमाणात हाय कॅफीन ड्रिंक्स घेतल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. - प्रक्रिया केलेले फळांचे रस
फळांचे नैसर्गिक रस आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, बाजारात उपलब्ध असलेले पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले रस आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. या रसांमध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम रंग टाकले जातात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होऊन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते. फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. - दारू (अल्कोहोल)
जास्त प्रमाणात दारूचे सेवन हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे. अल्कोहोलमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे ब्लॉकेज तयार होते. याशिवाय, दारूमुळे यकृताचे नुकसान होऊन शरीरातील चरबी नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. दीर्घकाळ दारू पिणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. - पॅकबंद मिल्क शेक आणि स्मूदी
पॅकेज्ड मिल्क शेक आणि स्मूदी हे स्वादिष्ट असले तरी आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकतात. यामध्ये कृत्रिम साखर, रंग आणि फ्लेवर्स भरलेले असतात. या पेयांचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि ब्लॉकेजचा धोका निर्माण होतो.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी हे करा:
- साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेल्या ड्रिंक्सच्या सेवनाला मर्यादा घाला.
- नैसर्गिक आणि ताज्या फळांचा रस निवडा.
- भरपूर पाणी प्या आणि ग्रीन टी, हर्बल टीसारखे आरोग्यदायी पर्याय निवडा.
- नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या.
हेही वाचा :
तौबा-तौबा… पंजाबी गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मारामारी.. Video
5 रुपयांच्या नाण्यासंदर्भात मोठा निर्णय….
मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा