या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळते ३००० रुपयांची पेन्शन, काय आहे योजना?

प्रत्येक कर्मचाऱ्याचे हे पीएफ अकाउंट असते. या पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला काही रक्कम जमा केली जाते. दरम्यान, जे कर्मचारी संघटित क्षेत्रात काम करत नाही त्यांना पेन्शन मिळत नाही.(pension)अशा कर्मचाऱ्यांसाठीच सरकारने एक योजना सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना २०१९ मध्ये लाँच केली होते. या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेत स्ट्रीट वेंडर, ड्राव्हर, रिक्षाचालक, मजूर, कामगार, बीडी मजूर किंवा कृषी श्रमिक कर्मचाऱ्यांना मदत मिळते.असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना ३००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते. ही योजना त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न १५००० रुपयांच्या आत आहे. (pension)या योजनेत १८ ते ४० वयोगटातील कर्मचारी पात्र आहेत.

या योजनेत तुम्ही दर महिन्याला जेवढे पैसे गुंतवतात तेवढेच पैसे सरकारकडून जमा केले जातात. जर तुम्ही ५०० रुपये गुंतवले तर सरकारकडून ५०० रुपये मिळतात. या योजनेत जर १८ वर्षीय व्यक्तीने महिन्याला ५५ रुपये गुंतवायचे आहेत. तर ४० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला २०० रुपये जमा करायचा आहे. यानंतर तुम्हाला दर महिन्याला ३००० रुपये पेन्शन मिळते.

जर तुम्ही १८ वर्षांचे असाल तर तुम्हाला दर महिन्याला ५५ रुपये गुंतवावे लागेल.(pension)जर तुम्ही २९ वर्षांचे असाल तर १०० रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच सरकारकडूनदेखील १०० रुपये मिळणार आहे. ४० वयोगटातील नागरिकांना २०० रुपये गुंतवावे लागणार आहे. तुम्हाला वयाच्या ६० वर्षापर्यंत हे योजनेत गुंतवणूक करायची आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर

कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

‘लग्नात अक्षतांऐवजी वाटल्या झाडांच्या बिया’; उंडाळ्यात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचा संदेश