या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना ७००० रुपये मिळाले आहेत.पीएम किसान(Farmer)योजनेचा २०वा हप्ता जमा झाला आहे. कोट्यवधि शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत.परंतु देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ७००० रुपये जमा झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अतिरिक्त ५००० रुपये दिले गेले आहेत.

आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना ७००० रुपये दिले आहेत. या योजनेत जवळपास ४५ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना अन्नदाता सुखीभव योजनेत पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना ५००० रुपये दिले गेले आहे.आंध्र प्रदेशमधील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत ९.७ कोटी शेतकऱ्यांना(Farmer) लाभ मिळाला आहे. या योजनेत प्रत्येकी २००० रुपये दिले जाणार आहे. २०५०० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना २००० रुपये नही तर ७००० रुपये दिले जातात.आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी ही योजना पीएम किसान योजनेसोबत जोडली आहे. या योजनेचं नाव अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजना आहे.

या योजनेत दरवर्षी २०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यात आता शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश सरकारकडून ५००० रुपये आणि केंद्र सरकारकडून २००० रुपये दिले आहेत. या योजनेत ४५,८५,८३८ शेतकऱ्यांना ७००० रुपये दिले आहेत.आंध्र प्रदेश सरकार दर वर्षांला २०,००० रुपये दिले जाणार आहे. दर चार महिन्यांनी हे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेसोबतच तुम्हाला या योजनेचे ५००० रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या(Farmer) खात्यात ७००० रुपये मिळणार आहेत.

पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. २ ऑगस्ट रोजी २०वा हप्ता जमा करण्यात आला आहे.आंध्र प्रदेशमधील सरकारने अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना ७००० रुपये मिळाले आहेत.शेतकऱ्यांना ७००० रुपये का दिले? पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना २००० रुपये दिले आहेत तर अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजनेत ५००० रुपये दिले जातात.

हेही वाचा :

श्रावणातील आजच्या सोमवारी रात्रीच्या वेळेस करा ‘हे’ उपाय; प्रत्येक काम यश मिळेल नक्की
लवकरच होणार मोठा धमाका! या महिन्यात लाँच होणार हे दमदार 5G स्मार्टफोन्स, Google Pixel चा असणार समावेश
सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट फ्लॉप; केदार शिंदे म्हणाले, “माझ्याच विचारातच खोट… प्रेक्षकांना सूरज अभिनेता म्हणून नकोच असेल”