‘या’ रहिवाशांना आता दरमहा मिळणार 20,000 रुपये मिळणार!

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर MHADA (म्हाडा) ने मुंबईतील रहिवाशांसाठी(residents ) एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दरमहा ₹20,000 भाडे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून, हे भाडे तीन वर्षांपर्यंत दिले जाणार आहे.

MHADA च्या सर्वेक्षणात मुंबईतील 96 इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या इमारतींमध्ये सुमारे 2400 भाडेकरू वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी म्हाडा प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत.

म्हाडाच्या या निर्णयानुसार: रहिवाशांनी(residents ) स्वतःची पर्यायी वास्तव्याची व्यवस्था केली, तर त्यांना प्रति महिना ₹20,000 भाडे म्हाडा देणार आहे, तसेच हे भाडे एकूण तीन वर्षांपर्यंत देण्यात येणार आहे. सध्या संक्रमण शिबिरात फक्त 786 घरे उपलब्ध असल्यामुळे 400 नव्या घरांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे (180 ते 250 चौ.फुट क्षेत्रफळ असलेली घरे).

स्थानिक स्थलांतरासाठी मदतीचा निर्णय :
दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील म्हाडाच्या अनेक जुन्या इमारती आज अतिधोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींमधून स्थलांतर करणे, विशेषतः शाळा, नोकरी आणि व्यवसाय लक्षात घेता, अनेकांसाठी कठीण होते. यामुळेच MHADA कडून मिळणारी भाडे मदत नागरिकांना त्याच परिसरात नव्याने वास्तव्य करण्यास मदत करेल.

हेही वाचा :