बऱ्याचदा शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते.(treatment) मात्र फुफ्फुसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. फुफ्फुस निकामी झाल्यानंतर शरीरात ही महाभयंकर लक्षणे दिसून येतात.

बदललेलं वातावरण, आहारात होणारे बदल, धूळ, प्रदूषण आणि इतरही अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात थकवा (treatment)निर्माण होणे, अशक्तपणा जाणवणे, कमजोरी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच म्हातारपण येण्याची शक्यता असते. तसेच फुफ्फुसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. फुफ्फुस शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. पण वाढत्या वयानुसार फुफ्फुसांची क्षमता कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास फुफ्फुस निकामी होऊन जातात.

श्वास घेण्यास त्रास होणे:
फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. श्वासांच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. थोडस चालल्यानंतर किंवा थोडं धावल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. (treatment)वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. श्वास घेताना अडचणी निर्माण होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्या घेऊन योग्य ते औषध उपचार करावे.
खोकला येणे:
दिवसभरात तुम्हाला जर सतत खोकला येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा घेऊन उपचार करावे. सकाळी किंवा धूळ-प्रदूषणाच्या संपर्कात गेल्यानंतर फुफ्फुसांची क्षमता कमी होऊन जाते. याशिवाय वारंवार खोकला येत असेल तर धूळ मातीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्मोकिंग किंवा वारंवार प्रदूषणामध्ये फिरणाऱ्या लोकांना फुफ्फुसांचे आजार होण्याची जास्त शक्यता असते. क्रॉनिक ब्रोंकायटिस किंवा COPD इत्यादी आजारांची लागण होऊन शरीराला हानी पोहचते.
थकवा-कमजोरी:
फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे शरीराची एनर्जी कमी होऊन जाते आणि काम करण्याची क्षमता कमी होते. शरीरात जाणवत असलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी योग्य औषध उपचार घेणे आवश्यक आहे.
छातीमध्ये जडपणा जाणवणे:
श्वास घेताना त्रास होणे, छातीमध्ये जडपणा जाणवणे किंवा आखडल्यासारखे वाटू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फुफ्फुसांचे आरोग्य बिघडल्यानंतर अस्थमा, ब्रोंकायटिस किंवा फुप्फुसात सूज इत्यादी लक्षणे दिसून येतात. वय वाढल्यानंतर फुफ्फुसांची नलिका कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे श्वास घेताना अनेक समस्या उद्भवतात.
ही लक्षणे आढळल्यास काय करावे?
जर तुम्हाला वर नमूद केलेली कोणतीही लक्षणे आढळली तर योग्य निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर सोडणे ही तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे.
कमकुवत फुफ्फुसांची लक्षणे?
शारीरिक हालचाली दरम्यान, आणि सहज थकवा जाणवणे ही फुफ्फुसांच्या कमकुवतपणाची लक्षणे असू शकतात. श्वास घेताना शिट्टीचा आवाज (घरघर) आणि सतत खोकला, विशेषतः श्लेष्मासह, फुफ्फुसांच्या समस्या दर्शवू शकतो.
हेही वाचा :
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Punch CNG होईल तुमची ! किती असेल EMI?
कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १९ ते २५ जुलै २०२५ – मराठी राशी भविष्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले, व्हाईट हाऊसने केला खुलासा